‘पुढारी राईज अप महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धे’चा दिमाखात प्रारंभ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :  स्त्रीशक्तीच्या सन्मानासह महिलांच्या शारीरिक, आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावे या उद्देशाने ‘पुढारी राईज अप’अंतर्गत कोल्हापुरात प्रथमच महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक मैदानावर शुक्रवारी या स्पर्धेचा दिमाखात प्रारंभ झाला. दि. 4 फेब—ुवारीपर्यंत दररोज सकाळी 9 ते … The post ‘पुढारी राईज अप महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धे’चा दिमाखात प्रारंभ appeared first on पुढारी.
Bharat Live News Media राईज अप महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धे’चा दिमाखात प्रारंभ

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  स्त्रीशक्तीच्या सन्मानासह महिलांच्या शारीरिक, आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठी, त्यांच्यात खेळांची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या क्रीडा कौशल्याला पाठबळ मिळावे या उद्देशाने ‘Bharat Live News Media राईज अप’अंतर्गत कोल्हापुरात प्रथमच महिलांच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक मैदानावर शुक्रवारी या स्पर्धेचा दिमाखात प्रारंभ झाला. दि. 4 फेब—ुवारीपर्यंत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील तब्बल 1500 शाळा-महाविद्यालयीन महिला-मुलींनी उत्सफूर्त सहभाग नोंदविला आहे. Kolhapur News
पहिल्या दिवशी (शुक्रवार) 15 व 19 वयोगटातील मलींच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धा सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार असल्या तरी 7 वाजल्यापासूनच खेळाडू, प्रशिक्षक व पालकांनी मैदानात गर्दी केली होती. रजिस्ट्रेशन कक्षात बीब्स (चेस्ट नंबर) घेण्यासाठी लांब रांग लागली होती. बीब्स मिळाल्यावर खेळाडूंनी पहिल्या दिवसाच्या वेळापत्रकाचे वाचन केले. त्यानुसार आपली इव्हेंट किती वाजता आहे, याची माहिती घेतल्यानंतर सराव, आहार यासह विविध गोष्टींचे नियोजन केले. यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रेक्षक गॅलरीसह मैदानाच्या सभोवतीच्या जाळीतून खेळाडूंचे पालक-प्रशिक्षक व सहकारी खेळाडू प्रोत्साहन देत होते. खेळाडूंना दुखापत झाल्यास प्रथमोपचारासाठी दोन अ‍ॅम्ब्युलन्ससह वैद्यकीय पथक सज्ज होते. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची सुमारे 60 जणांची टीम पहाटे 6 ते सायंकाळी 6 अशी सुमारे 12 तास अखंड राबत होती. Kolhapur News
 Kolhapur News : सिंथेटिक ट्रॅकवर पहिल्यांदाच धावल्याचा आनंद
स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातरा जिल्ह्यांतील सुमारे 1500 महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी खेळाडू ग्रामीण व दुर्गभ भागातून आहेत. यापैकी बहुतांशी खेळाडूंना सरावासाठी साधी मैदानेही नाहीत. अनेक खेळाडू तर प्रथमच सिंथेटिक ट्रॅकवर स्पर्धा खेळल्या. यामुळे त्यांना या मैदानाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मैदानात उतरताच त्यांनी ट्रॅकला हात लावून तो कसा आहे, याची पाहणी केली. ही स्पर्धा आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा 

Bharat Live News Media राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व
कोल्हापूर : अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविण्यास रणरागिणी सज्ज
Kolhapur News : दै. ‘Bharat Live News Media राईज अप’; महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा: खेळाडूंसह पालकांमध्ये उत्साह 

Latest Marathi News ‘Bharat Live News Media राईज अप महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धे’चा दिमाखात प्रारंभ Brought to You By : Bharat Live News Media.