सतत झोपमोड होणे मेंदूसाठी हानिकारक; तज्ज्ञ काय सांगतात?

नवी दिल्ली : तन-मनाच्या विश्रांती आणि आरोग्यासाठी सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. मात्र, अनेकांना रात्री सतत झोपमोड होणे, पुरेशी झोप न मिळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. जर रात्री नीट झोप येत नसेल किंवा ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया असेल तर यामुळे मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याबद्दल आलेला … The post सतत झोपमोड होणे मेंदूसाठी हानिकारक; तज्ज्ञ काय सांगतात? appeared first on पुढारी.

सतत झोपमोड होणे मेंदूसाठी हानिकारक; तज्ज्ञ काय सांगतात?

नवी दिल्ली : तन-मनाच्या विश्रांती आणि आरोग्यासाठी सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असते. मात्र, अनेकांना रात्री सतत झोपमोड होणे, पुरेशी झोप न मिळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. जर रात्री नीट झोप येत नसेल किंवा ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया असेल तर यामुळे मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याबद्दल आलेला एक नवीन अहवाल म्हणतो की, भारतात 10 पैकी एका व्यक्तीला असा त्रास आहे आणि वय वाढल्यानंतर त्यांच्या विचारशक्तीवर याचा परिणाम होतो. या अहवालासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. कामेश्वर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले. (Sleep apnea)
संबंधित बातम्या : 

निरोगी जीवनासाठी पाण्याचे योगदान
शेंगभाज्या का खाव्यात?
पिंढरी दुखण्याचा त्रास, जाणून घ्या कारणे आणि उपाय

भारतातील अनेक आरोग्य संस्थांसह नेदरलँड्सच्या इरामस मेडिकल सेंटरच्या संसर्गजन्य रोग विभाग आणि अमेरिकेतल्या हार्वर्ड टीएच चेन स्कूलच्या पब्लिक हेल्थ आणि सोशल, बिहेव्हियरल सायन्सेसच्या डॉक्टरांनी एकत्र येत हे संशोधन केले. डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी म्हटले आहे की, ‘भारतात हे अशा तर्‍हेचं पहिलं संशोधन आहे. यात जिनोमिक्स, न्यूरोइमेजिंग आणि झोपेशी संबंधित अनेक पैलूंचा अभ्यास केला गेला. यात महिला आणि पुरुषांची संख्या जवळपास सारखी होती. भारतातही इतर देशांसारखंच लोकांचं जीवनमान वाढल्याने ज्येष्ठांची संख्या वाढतेय. पुढे ही संख्या अजून वाढत जाणार आहे. वय वाढल्याने जे आजार होतात त्यात प्रामुख्याने डिमेन्शिया (स्मृतिभंश), हृदय रोग किंवा स्ट्रोक असे आजार आहेत. आजवर जे संशोधन झालं ते या आजारांवर केंद्रित होतं. ज्या लोकांना नीट झोप येत नाही, सतत झोपमोड होते त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता ज्यांची झोप पूर्ण होते किंवा ज्यांना शांत झोप लागते त्या लोकांच्या तुलनेत कमी होती.’ (Sleep apnea)
काय आहे ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया?
‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओएसए एक प्रकारचा आजार आहे ज्यात झोपलेल्या माणसाचा श्वास सारखा सारखा थांबतो. (Sleep apnea)
डॉक्टर जेसी सुरी फोर्टस हॉस्पिटलमध्ये पल्मनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन विभागाचे प्रमुख आहेत. याबद्दल आणखी माहिती देताना ते म्हणतात की, एखादी व्यक्ती दिवसा आरामात श्वास घेते आणि सोडते. यात काही अडचण येत नाही, पण रात्री झोपताना आपले स्नायू शिथिल होतात. ते पुढे सांगतात, ‘झोपेत आपली जीभ घशाच्या मागच्या भागात जाते. यामुळे श्वासनलिका बंद होण्याची शक्यता निर्माण होते आणि श्वास थांबू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबला तर जीभ कार्यरत होते, ती पुन्हा तोंडात येते आणि श्वासाचा रस्ता मोकळा होतो. मग जीभ परत मागे जाते, पुन्हा श्वास थांबतो, पुन्हा त्या व्यक्तीला जाग येते आणि हे चक्र चालू राहातं. यालाच ‘ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया’ असे म्हणतात.’
हेही वाचा : 

बोलण्यातील दोष आणि ‘ड’ जीवनसत्त्व
कंबरदुखीने त्रस्त आहात? ‘हा’ व्यायाम प्रकार ठरेल फायदेशीर

The post सतत झोपमोड होणे मेंदूसाठी हानिकारक; तज्ज्ञ काय सांगतात? appeared first on Bharat Live News Media.