‘मी जिवंत आहे’! निधनाच्या वृत्तानंतर अखेर पूनम पांडे प्रकटली

Bharat Live News Media ऑनलाईन : मॉडेल- अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली होती. ही माहिती त्याच्या व्यवस्थापकाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून दिली होती. पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताने पूनम पांडेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसरीकडे, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर तिचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले होते. याच दरम्यान पूनम पांडेने ‘मी जिवंत आहे’ असे म्हटले आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की ती बरी आहे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल जागृती करण्यासाठी हे केले गेले. या कॅन्सरने अनेक लोकांचा बळी घेतला आहे.
The post ‘मी जिवंत आहे’! निधनाच्या वृत्तानंतर अखेर पूनम पांडे प्रकटली appeared first on Bharat Live News Media.
