केजरीवालांना नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीस पुन्हा त्यांच्या निवासस्थानी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी काल (दि.२) आपचे मुख्य आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी समन्स धुडकावला. दरम्यान काल केजरीवाल यांनी ईडीची पाचव्यांदा चौकशी नोटीस फेटाळली. यानंतर आज पुन्हा दिल्ली क्राइम ब्रँचची टीम दिल्ली सीएम केजरीवाल यांच्या घरी नोटीस देण्यासाठी पोहचले आहेत. (Arvind Kejriwal APP)
दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल यांनी भाजप आमदारांवर आरोप केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यासाठी दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम सीएम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचत स्वत: ही नोटीस दिली आहे. याआधी कालही क्राइम ब्रँचची टीम नोटीस देण्यासाठी केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. (Arvind Kejriwal APP)
दिल्ली पोलिस काल मुख्यमंत्र्यांना नोटीस देणार होते, मात्र मुख्यमंत्री पुढे न आल्याने अधिकाऱ्यांनी नोटीस घेण्याचा आग्रह सुरू केला. त्यामुळे दिल्ली पोलिसांचे पथक परतले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आज पुन्हा दाखल झाले आहे. ही नोटीस मुख्यमंत्र्यांनाच दिली जाईल, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Arvind Kejriwal APP)
हेही वाचा:
Arvind Kejriwal On BJP: केजरीवालांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले,’आपच्या आमदाराला २५ कोटी’
Arvind Kejriwal vs ED : अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीचे समन्स, आप-भाजपमध्ये जुंपली
CM Arvind Kejriwal : केजरीवाल आज ‘ई़़डी’समोर हजर राहणार नाहीत
Latest Marathi News केजरीवालांना नोटीस देण्यासाठी दिल्ली पोलीस पुन्हा त्यांच्या निवासस्थानी Brought to You By : Bharat Live News Media.