‘ब्ल्यू चीज’चे असतात अनेक लाभ
वॉशिंग्टन : चीजमध्येही तुम्हाला अनेक प्रकार मिळतील. आज आपण निळ्या चीजबद्दल म्हणजे ‘Blue cheese’ बद्दल जाणून घेणार आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या मते, ब्ल्यू चीजमध्ये कॅल्शियम भरपूर असते, जे निरोगी दात आणि हाडांसाठी आवश्यक आहे. याच्या सेवनाचे इतरही अनेक आरोग्य फायदे असू शकतात. हे फायदे समजून घेऊया…
संबंधित बातम्या :
निरोगी जीवनासाठी पाण्याचे योगदान
शेंगभाज्या का खाव्यात?
पिंढरी दुखण्याचा त्रास, जाणून घ्या कारणे आणि उपाय
तज्ज्ञांच्या मते, आहारात ब्ल्यू चीज (Blue cheese) चा समावेश करून हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. ‘सायंटिफिक वर्ल्ड जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे ब्ल्यू चीजचे सेवन करतात त्यांना ब्ल्यू चीजचे सेवन न करणार्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका कमी असतो. ब्ल्यू चीज खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.
Blue cheese : सांधेदुखीचा धोका होतो कमी
ब्ल्यू चीजमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी ब्ल्यू चीजचे सेवन फायदेशीर मानले जाते. ब्ल्यू चीजमध्ये फॉस्फरसदेखील आढळतो, त्याच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात. ब्ल्यू चीजमध्ये प्रथिने मुबलक असतात, त्यांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. कॅल्शियम असल्यामुळे ब्ल्यू चीज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशा प्रकारे सांधेदुखीचा धोकाही कमी होतो.
हेही वाचा :
बोलण्यातील दोष आणि ‘ड’ जीवनसत्त्व
कंबरदुखीने त्रस्त आहात? ‘हा’ व्यायाम प्रकार ठरेल फायदेशीर
गर्भाशय मुखाचा कॅन्सर कसा टाळावा? जाणून घ्या लक्षणे
Latest Marathi News ‘ब्ल्यू चीज’चे असतात अनेक लाभ Brought to You By : Bharat Live News Media.