192व्या स्मृतिदिनी मानवंदना; राजे उमाजी नाईक यांचा इतिहास अद्याप दुर्लक्षितच
नितीन पवार
कसबा पेठ : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंग्रजांना 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या देशभक्तीचा प्रेरणादायी इतिहास अद्याप दुर्लक्षितच आहे. हा इतिहास देशभरच नव्हे तर जगभर पोहचावा, यासाठी उमाजी नाईक स्मारक समितीकडून महापालिका आणि महसूल प्रशासनाकडे विनवण्या कराव्या लागत आहे. मामलेदार कचेरी, शुक्रवार पेठ येथील स्मारकाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी समितीकडून होत आहे. शनिवारी (दि. 3) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 192 व्या स्मृतिदिनी समितीकडून मानवंदना, ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांनी बंदिवास भोगलेल्या मामलेदार कचेरी, शुक्रवार पेठ येथील ऐतिहासिक कारागृहाचा काही भाग. आद्य क्रांतिवीरांविरोधात चालविलेल्या खटल्यांची न्याायालयीन इमारत तसेच खटल्याच्या वेळी डांबून ठेवण्यात आलेली अंधार कोठडी, त्यांना फाशी दिलेले ठिकाण, फाशी दिल्यानंतर इतर देशवासीयांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह तीन दिवस टांगून ठेवलेले पिंपळाचे झाड, अशा सर्व ऐतिहासिक वास्तूंचे संघटनेकडून व समाजाकडून स्वखर्चाने जतन व संवर्धन करण्याचा प्रयत्न होत आहे.
संघटनेच्या मागणीनुसार 2005 साली महाराष्ट्र शासनाने येथे स्मारक बांधणे व त्याचे सुशोभीकरण करणे. कायापालट करणे, यासाठी संघटनेच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी नियोजित आराखडा व प्रमुख कामे इत्यादीसाठी शासकीय कागदपत्रांची पूर्तता व भरीव निधीची तरदू होण्याची मागणी केली आहे. पण, सरकारने स्मारक घोषित केले, तरी पाहिजे तसा विकास केलेला नाही, असे संघटनेचे विश्वस्त सुनील जाधव यांनी सांगितले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे फाशीचे ब्रिटीशकालीन ठिकाण असलेल्या मामलेदार कचेरी शुक्रवार पेठ येथील स्मारकाचा विकास करणे ही महत्त्वाची मागणी 18 ऑगस्ट 22 रोजी विधानपरिषद सभागृहाने मान्य व मंजूर दिली आहे. परंतु, निधी अजूनही शासनाकडून वर्ग झाला नाही, असे समितीकडून सांगण्यात आले.
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक हेरिटेज ’ब’ वर्गात येत आहे. सरकारने राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकविकासासाठी थोडीफार कामे केली. उर्वरित कामे पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका सुरू करण्यात याव्या, यासाठी प्रयत्न सुरू आहे. महापालिका प्रशासनाने सुभोभीकरण करावे.
– आप्पासाहेब चव्हाण, अध्यक्ष, क्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारक समिती
हेही वाचा
Passport : केवळ ५०० लोकांकडे आहे ‘हा’ सर्वात दुर्लभ पासपोर्ट
Fraud Case : कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; व्यावसायिकाची फसवणूक
सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया प्रकरण : प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केव्हा होणार?
Latest Marathi News 192व्या स्मृतिदिनी मानवंदना; राजे उमाजी नाईक यांचा इतिहास अद्याप दुर्लक्षितच Brought to You By : Bharat Live News Media.