घसरणीचे सत्र ‘जैसे थै’, जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील मिश्र संकेताचे पडसाद आज ( दि.२०) देशांतर्गत शेअर बाजारावर दिसले. मागील आठवड्यातील शेवटच्‍या दिवशी झालेली घसरण आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशीही कायम राहिली. आज  १३९ अंकांनी घसरण अनुभवत सेन्‍सेक्‍स ६५,६५५ पातळीवर तर निप्‍टी ३७ अंकांच्‍या घसरणीने १९६९४ वर स्‍थिरावला. याआधी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स १८७ अंकांनी घसरून ६५,७९४  वर बंद झाला होता. … The post घसरणीचे सत्र ‘जैसे थै’, जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.
घसरणीचे सत्र ‘जैसे थै’, जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं?


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील मिश्र संकेताचे पडसाद आज ( दि.२०) देशांतर्गत शेअर बाजारावर दिसले. मागील आठवड्यातील शेवटच्‍या दिवशी झालेली घसरण आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशीही कायम राहिली. आज  १३९ अंकांनी घसरण अनुभवत सेन्‍सेक्‍स ६५,६५५ पातळीवर तर निप्‍टी ३७ अंकांच्‍या घसरणीने १९६९४ वर स्‍थिरावला. याआधी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स १८७ अंकांनी घसरून ६५,७९४  वर बंद झाला होता.
शेअर बाजाराची सपाट सुरुवात
मिश्र जागतिक संकेतांमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 65,750 आणि निफ्टी 19,730 च्या जवळ व्यवहार करत होता. बँकिंग क्षेत्रातील शेअर्संनी बाजारावर दबाव आणला. दिवसभर बाजारात चढ-उताराचे व्यवहार झाले. आयटी आणि रिॲल्टी शेअर्संनी सकारात्‍मक सुरुवात केली. ओबेरॉय रियल्टी, डिव्हिस लॅब्स, बिर्ला सॉफ्ट, एल अँड टी टेक्नॉलॉजी, ॲड बलरामपूर चिनी यांनी तेजी अनुभवली. आज आयटी, रियल्टी, फार्मा शेअर्स 0.5 टक्क्यांनी वधारले. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, न्याका आणि बजाज फायनान्स हे ‘निफ्‍टी’वरील सर्वात सक्रिय शेअर्स ठरले.
विक्रीचा जोर कायम
कमकुवत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही विक्री दिसून आली. आयटी आणि हेल्थकेअर समभागात अल्‍प खरेदी झाली. वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागात विक्री दिसून आली.
मिडकॅप शेअर्सचा बोलबाला कायम
मिडकॅप शेअर्समधॅल बोलबाला आजही कायम राहिला. तो नवीन शिखरावर पोहोचला. आयटी शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक जवळपास एक टक्क्यांनी वाढल्‍याचे दिसले. कोफोर्ज, बिर्लासॉफ्ट, एमफेसिस सारख्या समभागातही एक टक्का वाढ झाली.दरम्यान, पीएलआय योजनेला मंजुरी मिळाल्याने आयटी हार्डवेअर कंपन्यांना गती मिळाली.
ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात ३१ महिन्‍यांच्‍या उच्‍चांकावर
ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या आयातीत 60% वाढ झाली आहे, तर ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात 31 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. वार्षिक आधारावर, ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात 60% वाढून 123 टन झाली आहे.

The post घसरणीचे सत्र ‘जैसे थै’, जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील मिश्र संकेताचे पडसाद आज ( दि.२०) देशांतर्गत शेअर बाजारावर दिसले. मागील आठवड्यातील शेवटच्‍या दिवशी झालेली घसरण आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशीही कायम राहिली. आज  १३९ अंकांनी घसरण अनुभवत सेन्‍सेक्‍स ६५,६५५ पातळीवर तर निप्‍टी ३७ अंकांच्‍या घसरणीने १९६९४ वर स्‍थिरावला. याआधी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स १८७ अंकांनी घसरून ६५,७९४  वर बंद झाला होता. …

The post घसरणीचे सत्र ‘जैसे थै’, जाणून घ्‍या आज शेअर बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.

Go to Source