गोळीबार प्रकरण- फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT स्थापन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणादरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात … The post गोळीबार प्रकरण- फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT स्थापन appeared first on पुढारी.

गोळीबार प्रकरण- फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT स्थापन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणादरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. (Ulhasnagar firing incident)
यानंतर उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेच्या तपासासाठी एसीपी नीलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Ulhasnagar firing incident)

Ulhasnagar firing incident | Maharashtra Deputy CM and Home Minister Devendra Fadanavis has ordered a high-level inquiry into the incident.
(File photo) pic.twitter.com/LTJCE8XpSx
— ANI (@ANI) February 3, 2024

Ulhasnagar firing incident | A Crime branch SIT, led by ACP Nilesh Sonawane, formed for the investigation of the incident. https://t.co/kKVffft9IR
— ANI (@ANI) February 3, 2024

काय आहे नेमकं गोळीबार प्रकरण?
द्वारली गावात एका भूखंडावर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी महेश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली होती. याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या मागे महेश गायकवाड यांचे समर्थकही पोहचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर दोन्ही गट बसलेले असताना हा गोळीबार झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
गणपत गायगवाड यांनी झाडल्या ६ गोळ्या
गणपत गायगवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राहुल पाटील यांनाही एक गोळी लागली. यादरम्यान हर्षल केणी यांनीही रिव्हॉल्वर बाहेर काढली होती, ती वरिष्ट पोलिस निरीक्षक जगताप यांनी लॉक केली. यावेळी झालेल्या झटापटीत जगताप देखील जखमी झाले. जखमींना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा:

Sanjay Raut On MH: महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत; खासदार राऊत यांचा घणाघात
अमळनेर येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन
सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृतीचा अभाव : जागृतीसाठी शासन राबविणार मोहीम

Latest Marathi News गोळीबार प्रकरण- फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT स्थापन Brought to You By : Bharat Live News Media.