IND vs ENG : यशस्वी जैस्वालचे द्विशतक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीमुळे पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ६ बाद ३३६ अशी होती. (India vs England, 2nd Test)
यशस्वी जैस्वालचे द्विशतक
यशस्वी जैस्वालने २७७ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. १०२ षटकांनंतर भारताची धावसंख्या ७ बाद ३८० आहे.
भारताची सातवी विकेट पडली
भारताची सातवी विकेट ३६४ धावांवर पडली. रविचंद्रन अश्विन ३७ चेंडूत २० धावा करून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला बेन फॉक्सकरवी झेलबाद केले. आता यशस्वीसोबत कुलदीप यादव क्रीजवर आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. यशस्वी जैस्वाल आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर आहेत. ९५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ६ बाद ३४३ आहे.
Latest Marathi News IND vs ENG : यशस्वी जैस्वालचे द्विशतक Brought to You By : Bharat Live News Media.