मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी

मुंबई : मुंबई शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्वत्र सतर्कचा इशारा दिला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाला गुरुवारी दुपारी हा धमकीचा कॉल आला होता. याप्रकरणी गुन्हा नोंदवून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसने धमकीचा संदेश देणार्‍याचा शोध सुरू केला आहे. गुरुवारी रात्री वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला … The post मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी appeared first on पुढारी.

मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी

मुंबई : मुंबई शहरात सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्वत्र सतर्कचा इशारा दिला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाला गुरुवारी दुपारी हा धमकीचा कॉल आला होता. याप्रकरणी गुन्हा नोंदवून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसने धमकीचा संदेश देणार्‍याचा शोध सुरू केला आहे.
गुरुवारी रात्री वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका व्हॉटस्अप क्रमांकावरून हा मेसेज प्राप्त झाला होता. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मुंबई शहरातील बंदोबस्तात वाढ करण्याबरोबरच नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून संशयितांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Latest Marathi News मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.