एसटीवर दगडफेक; सोमवार पेठेतील दोघांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक शाळेची सहल घेऊन आलेल्या एसटी व मोटारीवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवार पेठ येथील दोन तरुणांना शुक्रवारी अटक केली. एका बाल संशयितालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जाफर मंजूर सिनदी ( वय 20), सुबेध शमशुद्दीन मुजावर (27, रा. अकबर मोहल्ला, कोल्हापूर) … The post एसटीवर दगडफेक; सोमवार पेठेतील दोघांना अटक appeared first on पुढारी.

एसटीवर दगडफेक; सोमवार पेठेतील दोघांना अटक

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक शाळेची सहल घेऊन आलेल्या एसटी व मोटारीवर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवार पेठ येथील दोन तरुणांना शुक्रवारी अटक केली. एका बाल संशयितालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
जाफर मंजूर सिनदी ( वय 20), सुबेध शमशुद्दीन मुजावर (27, रा. अकबर मोहल्ला, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. बालसंशयितासह तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
येथील दसरा चौक येथे 31 जानेवारीला सायंकाळी ही घटना घडली होती. दगडफेकीत एसटी व मोटारीचे 30 हजारांचे नुकसान केले होते. या घटनेत दोन विद्यार्थीही जखमी झाले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. एसटी व मोटारीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
Latest Marathi News एसटीवर दगडफेक; सोमवार पेठेतील दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.