राज्यातील शिक्षकेतरांचा 12 फेब्रुवारीला मोर्चा
पुणे : शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याच्या निषेधार्थ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी 12 फेब्रुवारीला पुण्यातील शनिवारवाडा ते शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंगपर्यंत मोर्चा काढणार असून, 20 फेब्रुवारीपासून ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत.
सावंतवाडीत नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसांत सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्यामुळे राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाने निर्णय घेतला आहे.
हेही वाचा
‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ आज
Weather Update : महाबळेश्वर 12, पुणे 12.6 अंशांवर
आजार लपवून कामावर जाणार्यांची संख्या मोठी!
Latest Marathi News राज्यातील शिक्षकेतरांचा 12 फेब्रुवारीला मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.