महत्वाची बातमी : सीबीएसई उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये होणार बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. सीबीएसईने एक प्रस्ताव तयार केला असून, त्यानुसार दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक रचनेत मोठे बदल केले जाणार आहेत. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषय, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषय उत्तीर्ण करावे लागणार आहेत. सीबीएसईच्या प्रस्तावानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 ऐवजी 3 … The post महत्वाची बातमी : सीबीएसई उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये होणार बदल appeared first on पुढारी.

महत्वाची बातमी : सीबीएसई उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये होणार बदल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. सीबीएसईने एक प्रस्ताव तयार केला असून, त्यानुसार दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक रचनेत मोठे बदल केले जाणार आहेत. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषय, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषय उत्तीर्ण करावे लागणार आहेत.
सीबीएसईच्या प्रस्तावानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यात किमान 2 स्थानिक भाषा असाव्यात. याशिवाय दहावीत सात विषय जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यात गणित आणि कंप्युटेशन थिंकिंग, सामाजिक विज्ञान, विज्ञान, कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे. तीन भाषा, गणित आणि संगणकीय विचारसरणी, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे बाह्य मूल्यमापन केले जाईल. इतर 3 विषयांचे मूल्यांकन अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केले जाईल. 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व 10 विषय उत्तीर्ण करावे लागतील. यापेक्षा कमी विषयात उत्तीर्णांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही.
बारावीसाठी प्रस्तावित केलेल्या बदलांमध्ये विद्यार्थ्यांना आता 1 ऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागेल. यामध्ये किमान एक भाषा ही मूळ भारतीय भाषा असावी. तसेच विद्यार्थ्यांना 12 वी मध्ये 5 ऐवजी 6 विषयांत परीक्षा द्यावी लागेल. 6 विषयांमध्ये 2 भाषा आणि 4 इतर विषय असतील. आणखी एक बदल म्हणजे सीबीएसईच्या योजनेनुसार, आता एका शैक्षणिक वर्षात अंदाजे 1200 तास अध्यापन करावे लागणार आहे, यामुळे 40 क्रेडिट्स मिळविण्यात मदत होईल. प्रत्येक विषयासाठी तासांची निश्चित संख्या दिली जाईल आणि चांगले निकाल मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभरात सरासरी 1200 तास शाळेत घालवावे लागतील. परंतु, हा नवीन बदल कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
अधिक खुलेपणा व स्वातंत्र्य मिळणार
शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करणे, हा या बदलाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत शाळाप्रमुख आणि शिक्षकांकडून अभिप्राय घेतला होता. सर्वांकडून सकारात्मक आणि अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. यातून शिकवण्यासाठी अधिक खुलेपणा व स्वातंत्र्य मिळणार असल्याचेही शिक्षकांनी स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत सीबीएसईने सर्व बाबींचा विचार करून प्रस्तावाला अंतिम रूप दिले आहे.
हेही वाचा

Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ आज
आजार लपवून कामावर जाणार्‍यांची संख्या मोठी!
काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांचे वादग्रस्त विधान, संसदेत तीव्र पडसाद

Latest Marathi News महत्वाची बातमी : सीबीएसई उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये होणार बदल Brought to You By : Bharat Live News Media.