‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ आज
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी दै.‘Bharat Live News Media’तर्फे शनिवार, दि. 3 रोजी ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ होत आहे. जिल्ह्यात 31 व कोल्हापूर शहरात 9 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर दै. ‘Bharat Live News Media’तर्फे ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ घेण्यात येत आहे. ही परीक्षा तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मराठी व सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमांचा यात समावेश आहे.
प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. पेपर क्र. 1 मराठी, गणिताच्या 75 प्रश्नांसाठी 150 गुण असणार आहेत. हा पेपर सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 या वेळेत होईल. पेपर क्र. 2 इंग्रजी, बुद्धिमत्ता 75 प्रश्न व 150 गुण असतील. दुपारी 1.30 ते 3 या कालावधीत पेपर होईल.
‘ओएमआर’ शिटवर 300 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करावा. जिल्ह्यासह तालुका व शहरांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करून यावे. त्याचबरोबर परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत होणार असल्याने विद्यार्थ्यांनी पाणी बॉटल व टिफीन सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात जाहीर केला जाणार आहे. दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास पेपर दोनमध्ये जास्त गुण असतील तो पहिला असेल. त्यातही समान गुण मिळाल्यास लहान वय असणार्या विद्यार्थ्यास पहिला क्रमांक दिला जाईल.
परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर हजर राहावे
‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’चा शनिवारी सकाळी 11.30 वाजता पहिला पेपर सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे आहे.
शहर, जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे
कोल्हापूर शहर : न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा, रा. ना. सामाणी विद्यालय, स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज (पेटाळा, न्यू महाव्दार रोड), लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर (जरगनगर),
सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल (तपोवन), वि. स. खांडेकर प्रशाला (शाहूपुरी), महापालिका टेंबलाईवाडी विद्यामंदिर (टेंबलाईवाडी).
करवीर तालुका : कुमार कन्या विद्यामंदिर कोगे (कोगे), विद्यामंदिर कणेरीवाडी (कणेरीवाडी), रा. बा. पाटील विद्यालय (सडोली खालसा).
कागल तालुका : शिवराज विद्यालय (मुरगूड), श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल (कागल), विद्यामंदिर बानगे (बानगे), विद्यामंदिर म्हाकवे (म्हाकवे).
इचलकरंजी शहर : बालाजी हायस्कूल (विक्रमनगर), राजर्षी शाहू हायस्कूल (गोसावी गल्लीजवळ), कुसुमताई मणेरे हायस्कूल (कबनूर).
हातकणंगले तालुका : आदर्श गुरुकुल विद्यालय (पेठवडगाव), डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल (पेठवडगाव).
शिरोळ तालुका : पद्माराजे विद्यालय (शिरोळ).
पन्हाळा तालुका : कळे विद्यामंदिर अँड ज्यु. कॉलेज (कळे), माजगाव हायस्कूल (माजगाव), आनंदीबाई सरनोबत हायस्कूल (आसुर्ले-पोर्ले), यशवंत हायस्कूल (कोडोली).
राधानगरी तालुका : न्यू हायस्कूल (कसबे तारळे), श्री शिवाजी हायस्कूल (कसबा तारळे), श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय (सोळांकूर).
शाहूवाडी तालुका : बांबवडे हायस्कूल (बांबवडे), करंजफेण हायस्कूल (करंजफेण), मलकापूर हायस्कूल, जी. आर. वरंगे ज्यु. कॉलेज (मलकापूर), नंदगाव हायस्कूल (नंदगाव).
आजरा तालुका : श्री पार्वतीशंकर विद्यामंदिर (उत्तूर). भुदरगड तालुका : डी. वाय. पाटील शिक्षण संकुल (गारगोटी), कुमार भवन (कडगाव)
चंदगड तालुका : दि न्यू हायस्कूल (चंदगड), व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालय (पाटणे फाटा).
गगनबावडा तालुका : दत्ताजीराव मोहिते पाटील हायस्कूल (तिसंगी).
गडहिंग्लज तालुका : किलबिल विद्यामंदिर गडहिंग्लज.
Latest Marathi News ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ आज Brought to You By : Bharat Live News Media.