कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार
ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (दि.२) रात्री उल्हासनगर येथे गोळीबार झाला. जखमी गायकवाड यांना ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराची बातमी समजताच अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. कल्याण मध्ये भाजप आणि शिवसेनेत नेहमीच तणाव होत असतो. या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
Latest Marathi News कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार Brought to You By : Bharat Live News Media.