वाशीम : गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक
वाशीम; Bharat Live News Media वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) एका तरूणाला अटक केली. नितीन बबन दंदे (वय २९, रा. मोहगव्हाण, जि. वाशिम ) असे या तरूणाचे नाव असून त्याच्याविरूद्ध अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी (दि.२) वाशिम परिसरात व हद्दीमध्ये गस्त करत होते. यावेळी नितीन दंदे या तरूणाने गावठी पिस्तुल बाळगल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे, विनोद सुर्वे, राजेश राठोड, आशिष बिडवे, राम नागुलकर, महेश वानखेडे, विठ्ठल सुर्वे यांनी केली.
हेही वाचा :
सिंधुदुर्ग : किनळोसमध्ये शेतकरी महिलेच्या म्हैस विक्रीतून आलेल्या रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला
नागपूर : वाठोडा परिसरात आर्थिक वादातून दुहेरी हत्याकांड
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, २७ जखमी
Latest Marathi News वाशीम : गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक Brought to You By : Bharat Live News Media.