नागपूर : वाठोडा परिसरात आर्थिक वादातून दुहेरी हत्याकांड
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आर्थिक वादातून हल्लेखोरांच्या एका गटाने दिवसाढवळ्या दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात घडली. कृष्णकांत भट आणि सनी सरुडकर अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही आरोपी किरण शेंडे यांचे मित्र असल्याची माहिती वाठोडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिली. सनीने किरणला ईएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती. मात्र, किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्याने, सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले. त्यामुळे खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका चिघळला की आरोपी किरणने दगड आणि काठ्यांनी दोघांवर हल्ला केला यात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
Latest Marathi News नागपूर : वाठोडा परिसरात आर्थिक वादातून दुहेरी हत्याकांड Brought to You By : Bharat Live News Media.