Crime news : लग्नाला जाणार्‍या व्यापार्‍यास लुटले; गुन्हा दाखल

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर शहरात मंगल कार्यालयात लग्नासाठी जाणार्‍याला रस्त्यात अडवून त्याला ढकलून देवून जखमी करत त्याच्याकडील रोकड तसेच मोबाईल लुटून नेले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरातील गोंधवणीरोडवरील सिंधी मंदिराशेजारी राहणारे किसन रेलूमल आहुजा हे आपले मेनरोडवरील श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स नावाचे दुकान बंद करून मित्र … The post Crime news : लग्नाला जाणार्‍या व्यापार्‍यास लुटले; गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Crime news : लग्नाला जाणार्‍या व्यापार्‍यास लुटले; गुन्हा दाखल

श्रीरामपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  श्रीरामपूर शहरात मंगल कार्यालयात लग्नासाठी जाणार्‍याला रस्त्यात अडवून त्याला ढकलून देवून जखमी करत त्याच्याकडील रोकड तसेच मोबाईल लुटून नेले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरातील गोंधवणीरोडवरील सिंधी मंदिराशेजारी राहणारे किसन रेलूमल आहुजा हे आपले मेनरोडवरील श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स नावाचे दुकान बंद करून मित्र वाल्मिक डहाळे यांच्या मुलीच्या लग्नासाठी लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयाकडे टीव्हीएस वेगो कंपनीच्या गाडीवर जात होते.
नेवासा रोडवरुन ते जात असताना कांदा मार्केटच्या पुढे एचपी पंपाजवळ सकाळच्या सुमारास विरूद्ध दिशेने पायी येणार्‍या एकाने आहुजा यांची गाडी अडवली. त्यांना गाडीखाली ढकलून दिले. खाली पडल्याने आहुजा यांना मुकामार लागला. दरम्यान सदर अनोळखी इसमाने त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा हॅन्डसेट तसेच खिशातील रोख रक्कम काढून घेवून सदर व्यक्ती त्या ठिकाणाहून पळून गेला.
याप्रकरणी किसन रेलूमल आहुजा यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि कलम 341, 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
Latest Marathi News Crime news : लग्नाला जाणार्‍या व्यापार्‍यास लुटले; गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.