भाजपकडून कुठलेही प्रपोजल नाही, दमानियांना कुठून कळलं?

नाशिक Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व छगन भुजबळ यांच्यातील वाद तसा काही नवीन नाही. आता पुन्हा दमानिया यांनी भुजबळांवर ‘एक्स’ पोस्ट करुन निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या X खात्यावर पोस्ट करुन छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांनी भाजपवर टीका केली असून एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप अशी टीका केली आहे.
यासंदर्भात मंत्री भुजबळांना विचारले असता, भुजबळ म्हणाले की, मला अजुन काही माहिती नाही. त्यांना कशी काय माहिती मिळाली, हेही मला माहीत नाही. मात्र, मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला भाजपकडून आले नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
हेही वाचा :
Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण
मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती
रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत घंटानाद आंदोलन
Latest Marathi News भाजपकडून कुठलेही प्रपोजल नाही, दमानियांना कुठून कळलं? Brought to You By : Bharat Live News Media.
