खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत 4 अर्ज बाद

वडगाव मावळ : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 जागांसाठी दाखल झालेल्या 94 उमेदवारी अर्जांपैकी 4 अर्ज बाद झाले असून, 4 उमेदवारांची निवड बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, अ वर्गातील टाकवे गटातील उमेदवार शांताराम लष्करी यांनी प्रकाश देशमुख व शिवाजी असवले यांच्या अर्जावर हरकत घेऊन त्यांनी पाच वर्षांत संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्री व्यवसाय केला नसल्याने त्यांचा अर्ज बाद करावा, अशी लेखी तक्रार केली होती, त्यामुळे छाननीमध्ये देशमुख व असवले यांचे अर्ज बाद ठरविण्यात आला व शांताराम लष्करी यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, देशमुख व असवले यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील दाखल केले असल्याने लष्करी यांच्या बिनविरोध निवडीवर टांगती तलवार आहे.
महिला प्रतिनिधीच्या 2 जागांसाठी 8 अर्ज
छाननीनंतर सर्वसाधारण अ वर्ग प्रतिनिधी गटातील 9 पैकी 3 जागा बिनविरोधच्या मार्गावर असून 26 पैकी 2 अर्ज बाद झाल्याने 24 अर्ज शिल्लक राहिले आहेत. ब वर्ग गटातील 2 जागांसाठी 11 अर्ज आहेत. तर, क वर्ग गटातील 3 जागांसाठी दाखल झालेल्या 34 अर्जांपैकी साईनाथ गायकवाड यांचा अर्ज बाद झाल्याने 33 अर्ज शिल्लक आहेत. भटक्या विमुक्त जातीची 1 जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. महिला प्रतिनिधीच्या 2 जागांसाठी 8 अर्ज, अनुसूचित जाती जमाती 1 जागेसाठी 5 अर्ज, इतर मागास प्रवर्गच्या 1 जागेसाठी 8 अर्ज शिल्लक आहेत. एकंदर दाखल झालेल्या 94 उमेदवारी अर्जांपैकी 4 अर्ज बाद झाल्याने 90 अर्ज शिल्लक आहेत.
94 उमेदवारीअर्ज दाखल
संस्थेच्या 19 जागांसाठी 94 उमेदवारीअर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांपैकी क वर्गातील साईनाथ गायकवाड यांचा अर्ज बाद झाला. तसेच, भटक्या विमुक्त गटातील शरद नखाते यांचा अर्ज बाद झाल्याने त्या गटातील दत्तात्रय गिरिगोसावी यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय अ वर्गातील तळेगाव गटातून रुपेश घोजगे यांचा व साळुंब्रे गटातील बाजीराव वाजे यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने घोजगे व वाजे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा
मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती
रोहित पवारांची ईडीमार्फत चौकशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीत घंटानाद आंदोलन
भाजपच हिंदूत्व पक्ष फोडणार, पोलादपूर सभेत उद्धव ठाकरेंची टीका
Latest Marathi News खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत 4 अर्ज बाद Brought to You By : Bharat Live News Media.
