
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यातील वाद नवा नाही. या अगोदरही दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान अंजली दमानिया यांची एक पोस्ट चर्चेत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी भुजबळांवर निशाणा साधत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भुजबळ ‘भाजप’च्या वाटेवर? असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पोस्टची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर होवू लागली आहे. (Chhagan Bhujbal)
Chhagan Bhujbal : राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप….
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या छगन भुजबळांवर भ्रष्टाचारासंबधी आरोप केले आहेत. गुरुवारी (दि.१) त्यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत छगन भुजबळ यांच्यासह भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं आहे की,”कुठे फेडाल हे पाप “.पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप.”
अंजली दमानिया यांनी यापूर्वीही छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना लक्ष्य केले आहे.
यावर भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्हाला माहित आहे मी करत असलेल्या कामाबद्दल. दमानिया असे का म्हणाल्या, कशासाठी म्हणाल्या? याबद्दल मला कल्पना नाही असे माध्यमांशी बोलत असताना भुजबळ यांंनी म्हटले आहे.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
Jharkhand New CM: झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…’हेमंत यांच्या कामाला गती…’
Satara Accident : देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात आजोबासह नातू ठार, ५ जखमी
Symptoms Paralysis : मेंदूला होणार्या रक्तपुरवठ्याला अडथळा आला तर! जाणून घ्या पक्षाघाताची लक्षणे
Latest Marathi News भुजबळ ‘भाजप’च्या वाटेवर? दमानियांची पोस्ट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
