OpenAI ने काढले, Microsoft ने तारले! सॅम ऑल्टमन यांनी पदभार स्वीकारला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपूर्वी ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून मोठा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले होते. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत, ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी हे दोघेही मायक्रोसॉफ्ट जॉईन करत असल्याची माहिती … The post OpenAI ने काढले, Microsoft ने तारले! सॅम ऑल्टमन यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

OpenAI ने काढले, Microsoft ने तारले! सॅम ऑल्टमन यांनी पदभार स्वीकारला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपूर्वी ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून मोठा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले होते. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत, ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी हे दोघेही मायक्रोसॉफ्ट जॉईन करत असल्याची माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे. (Microsoft hires former OpenAI CEO)
नवीन नेतृत्त्वाला जाणून घेण्यासाठी  उत्सुक: Microsoft चे सीईओ
Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन प्रगत AI संशोधन कार्यसंघाचे नेतृत्व करणार आहेत. आम्ही एमेट शीअर (Emmett Shear) आणि ओएय (OAI) च्या नवीन नेतृत्त्वाला जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यास तसेच त्यांना त्यांच्या यशासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत. हे दोघेही Microsoft मध्ये सामील होणार असल्याची बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याचेही Microsoft चे सत्या नडेला यांनी म्हटले आहे. (Microsoft hires former OpenAI CEO)
आम्ही OpenAI सोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आमचा उत्पादन रोडमॅपवर विश्वास असून, आम्ही Microsoft Ignite वर घोषित केलेल्या प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच आमची क्षमता वापरून आम्ही आमचे ग्राहक आणि भागीदारांना सतत पाठिंबा देत आहोत, असे देखील Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांनी केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

We remain committed to our partnership with OpenAI and have confidence in our product roadmap, our ability to continue to innovate with everything we announced at Microsoft Ignite, and in continuing to support our customers and partners. We look forward to getting to know Emmett…
— Satya Nadella (@satyanadella) November 20, 2023

‘संवाद अभाव’हे सॅम यांना हटवण्याचे प्रमुख कारण
यासंदर्भातील माहिती देताना, OpenAI कंपनीने एका ब्लॉगमध्ये खुलासा केला होता की, ओपनएआयच्या बोर्डाला आता ऑल्टमन यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर बोर्डाला विश्वास नव्हता. बोर्ड सदस्य आणि सॅम यांच्यातील संवादाचा अभाव हे सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचे प्रमुख कारण असल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले होते. (Microsoft hires former OpenAI CEO)

Microsoft CEO Satya Nadella tweets, “Sam Altman and Greg Brockman will be joining Microsoft to lead a new advanced AI research team. We look forward to getting to know Emmett Shear and OAI’s new leadership team and working with them…” pic.twitter.com/ogeoDnyogq
— ANI (@ANI) November 20, 2023

कंपनीने हटवल्यानंतर ऑल्टमन यांचे ट्विट 
कंपनीच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती आता OpenAI कंपनीच्या सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारतील. पदावरून हटवल्यानंतर सॅम ऑल्टमन यांनी ट्विट केले होते की,  “मी ओपनएआयमध्ये जेवढा वेळ दिला तो खूप आवडला. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना खूप मजा आली. राजीनामा हा परिवर्तनवादी निर्णय होता. आता मी काय करणार, यानंतर काय होईल ते नंतर सांगेन.”
हेही वाचा:

Mira Murati : OpenAI च्या नवीन सीईओ मीरा मुरती कोण आहेत?
ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीने सॅम ऑल्टमन यांना सीईओ पदावरून हटवले
OpenAI ChatGPT : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा ‘AI’ संदर्भात मोठा इशारा; ‘या’ क्षेत्रांना धोका

The post OpenAI ने काढले, Microsoft ने तारले! सॅम ऑल्टमन यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपूर्वी ChatGPT बनवणाऱ्या OpenAI कंपनीकडून मोठा निर्णय घेण्यात आला होता. कंपनीने OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले होते. कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत, ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी हे दोघेही मायक्रोसॉफ्ट जॉईन करत असल्याची माहिती …

The post OpenAI ने काढले, Microsoft ने तारले! सॅम ऑल्टमन यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

Go to Source