पोर्न स्टार ते वादग्रस्त मॉडेल, पूनम पांडेचे वैवाहिक आयुष्य राहिले वादात!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पूनम पांडेचे आयुष्य वादग्रस्त गोष्टींना भरलेले होते. (Poonam Pandey ) कधी गोव्याच्या बीचवर न्यूड फोटोशूटमुळे तर कधी वैवाहिक जीवनात पतीवर छळ केल्याचा आरोप करून ती वादात राहिली. एक पोर्न स्टार ते मॉडेल असा तिचा प्रवास नेहमीच वादग्रस्त ठरला होता. (Poonam Pandey )
संबंधित बातम्या-
Poonam Pandey : मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडेचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन
Marathi Movie : इच्छामरण विषयावर भाष्य करणारा ‘आता वेळ झाली’
अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या Bade Miyan Chote Miyan चे जॉर्डन शूट पूर्ण
डेब्यू चित्रपटाच्या पोस्टरमुळे चर्चेत
पूनम पांडेने २०१३ मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटाच्या पोस्टरने धुमाकूळ घातला होता. काहींनी या बोल्ड पोस्टरचा विरोध देखील केला होता.
वैवाहिक आयुष्यातही वादात
पूनमचे वैवाहिक आयुष्यही वादात राहिले आहे. सॅम बॉम्बेसोबतचा त्याचा विवाह वादग्रस्त राहिले होते. पूनमने जेव्हा सॅम बॉम्बेसोबत लग्न केले, तेव्हाही तिची खूप चर्चा झाली होती. सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, तिचे हे वैवाहिक नातं फार काळ टिकले नाही. तिने २०२० मध्ये आपल्या लग्नानंतर लगेच पती सॅम बॉम्बेवर छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सॅम बॉम्बे अटक झाली होती. पण तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.
भारत वर्ल्ड कपवेळी व्हिडिओ मेसेजमुळे वादात
२०११ च्या वर्ल्ड कप मॅचच्या आधी तिने व्हिडिओ मेसेज दिला हातो की, जर भारत जिंकला तर ती आपले सर्व कपडे उतरवेल. या तिच्या विधानानवर खूप मोठा वाद झाला होता. तिच्या घरात देखील मोठा वाद झाला होता. घरच्यांनीही तिला या प्रकरणी फटकारले होते.
गोव्यात पोर्न शूटमुळे वादात
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी बीचवर न्यूड पोझसाठी तिने व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
लॉकडाऊनमध्येही पूनम पांडेला झाली होती अटक
पूनम पांडेला लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी तिला अटक केली होती. कोरोना काळात ती पती सॅम बॉम्बे सोबत फिरायला जात असताना कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती.
View this post on Instagram
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)
View this post on Instagram
A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)
Latest Marathi News पोर्न स्टार ते वादग्रस्त मॉडेल, पूनम पांडेचे वैवाहिक आयुष्य राहिले वादात! Brought to You By : Bharat Live News Media.