‘उजनी’तून भीमा नदीत चार हजार क्युसेक विसर्ग

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणार्‍या भाविकांसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सहा मोर्‍यांतून 4 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी यंदाच्या वर्षी कमी असल्याने व ती पन्नाशी पार केल्यानंतर पुन्हा 50 टक्क्यांच्या आत येऊन 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इंदापूरसह इतर या पाण्यावर अवलंबून असणारे सर्व जण धास्तावले … The post ‘उजनी’तून भीमा नदीत चार हजार क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

‘उजनी’तून भीमा नदीत चार हजार क्युसेक विसर्ग

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणार्‍या भाविकांसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सहा मोर्‍यांतून 4 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी यंदाच्या वर्षी कमी असल्याने व ती पन्नाशी पार केल्यानंतर पुन्हा 50 टक्क्यांच्या आत येऊन 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इंदापूरसह इतर या पाण्यावर अवलंबून असणारे सर्व जण धास्तावले आहेत. यामध्ये शेतकरी, उद्योग-व्यावसायिक, तसेच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असणाऱ्या ठिकाणांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
संबंधित बातम्या :

Vijay Wadettiwar : छगन भुजबळांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही: विजय वडेट्टीवार
धक्कादायक ! जमिनीच्या व्यवहारासाठी मृत भावाला दाखवले जिवंत
Nashik Weather : नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येत असून, किमान 22 नोव्हेंबरपर्यंत नदीत विसर्ग चालू राहणार आहे. या चार दिवसांत अंदाजे दीड टीएमसी पाणी नदी प्रवाहात सोडले जाईल. सध्या धरणात 42.43 टक्के पाणी असून, 86 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कालव्यातून 2 हजार 700 क्युसेक, बोगदा 900 क्युसेक, सीना माढा 333 क्युसेक व दहीगाव येथून 120 क्युसेक असा शेतीसाठी पाण्याचा विसर्ग जलाशयातून चालू आहे.
उजनी धरणातील पाणीपातळी
एकूण पाणीपातळी : 493.880 मीटर
एकूण पाणीसाठा : 86.39 टीएमसी
उपयुक्त साठा : 643.79 मीटर
(22.74 टीएमसी)
टक्केवारी : 42.43
भीमा नदीत विसर्ग : 4 हजार क्युसेक
भीमा सीना जोड कालवा : 900 क्युसेक
सीना माढा उपसा सिंचन : 333 क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन : 120 क्युसेक
कालवा : 2700 क्युसेक
वीजनिर्मिती प्रकल्प : 1600 क्युसेक
The post ‘उजनी’तून भीमा नदीत चार हजार क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणार्‍या भाविकांसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सहा मोर्‍यांतून 4 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातील पाणीपातळी यंदाच्या वर्षी कमी असल्याने व ती पन्नाशी पार केल्यानंतर पुन्हा 50 टक्क्यांच्या आत येऊन 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे इंदापूरसह इतर या पाण्यावर अवलंबून असणारे सर्व जण धास्तावले …

The post ‘उजनी’तून भीमा नदीत चार हजार क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

Go to Source