लंच ब्रेकपर्यंत भारत २ बाद १०३
Bharat Live News Media ऑनलाईन : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली. विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 2nd Test)
लंच ब्रेकपर्यंत भारत २ बाद १०३
पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात दोन गडी गमावून 103 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल ५१ धावा करून आणि श्रेयस अय्यर ४ धावा करून खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित 14 धावा करून बाद झाला. त्याला नवोदित शोएब बशीरने ओली पोपच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर यशस्वीने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. गिल मोठी खेळी खेळू शकेल असे वाटत असतानाच जेम्स अँडरसनने त्याला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. शुभमन पाच चौकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यापासून तो सातत्याने अपयशी ठरत आहे.
यशस्वीचे अर्धशतक
यशस्वी जैस्वालने 89 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला आहे. यशस्वी आणि श्रेयस अय्यर यांच्यावर मोठी भागीदारी करून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. भारताला दोन धक्के बसले आहेत. रोहित १४ धावा करून तर शुभमन गिल ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला बशीरने आणि शुभमनला अँडरसनने बाद केले.
भारताला दुसरा धक्का; शुभमन गिल माघारी
भारताला ८९ धावांवर दुसरा धक्का बसला. जेम्स अँडरसनने शुभमन गिलला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याने 46 चेंडूत 34 धावा केल्या. गिलने डावाची सुरुवात चांगली केली आणि पाच चौकार मारले, पण अँडरसनसमोर त्याला अडचणींचा सामना करावा लागला.
भारताला पहिला झटका, कर्णधार रोहित माघारी
सामन्यातील १८ व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. त्याला इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बसिरने पोपकरवी झेलबाद केले. आपल्या खेळीमध्ये रोहितने ४१ चेंडूत १४ धावांची खेळी केली.
भारतीय संघात बदल
दरम्यान, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला बाहेर ठेवण्यात आले आहे. मालिकांचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्याने किती क्रिकेट खेळले आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो संघात असणार आहे. तर आवेश खानला दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुन्हा सामील करुन घेण्यात आले आहे. (IND vs ENG 2nd Test)
टीम इंडियाच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हैदराबाद कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 2nd #INDvENG Test 🙌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV@IDFCFIRSTBank pic.twitter.com/fE4mYc9yfw
— BCCI (@BCCI) February 2, 2024
The post लंच ब्रेकपर्यंत भारत २ बाद १०३ appeared first on Bharat Live News Media.