ब्रेकिंग न्यूज: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे नेते चंपाई … The post ब्रेकिंग न्यूज: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध appeared first on पुढारी.
ब्रेकिंग न्यूज: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री होतील, अशी घोषणा झाली होती. या पार्श्वभूमीवर चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे नेते चंपाई सोरेन यांनी आज रांची येथील राजभवनात नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (Jharkhand New CM) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन यांच्यासोबतच काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता हेही राज्य कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. परंतु झारखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंपाई यांना राज्यपालांनी १० दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. (Jharkhand New CM)

JMM vice president Champai Soren takes oath as the Chief Minister of Jharkhand, at the Raj Bhavan in Ranchi. pic.twitter.com/xxcA7E8sxg
— ANI (@ANI) February 2, 2024

Jharkhand New CM : चंपाई सोरेन झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री
‘झारखंड मुक्ती मोर्चा’ विधीमंडळ पक्षाने नेते चंपाई सोरेन हे एक भारतीय राजकारणी आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. यानंतर ते झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले. आज २ फेब्रुवारी २०२४ पासून झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य आहेत आणि सेराईकेल्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान त्यांच्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी असणार आहे.
सोरेन यांना आणखी एक धक्का, याचिकेवर सुनावणीस ‘SC’चा नकार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्या जमीन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. हेमंत सोरेन यांना रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर ही घटना घडली आहे. “न्यायालये सर्वांसाठी आहे. उच्च न्यायालये ही घटनात्मक न्यायालये आहेत. जर आपण एका व्यक्तीला परवानगी दिली तर आपल्याला सर्वांना परवानगी द्यावी लागेल,” असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधीन अधिकार आहेत. “ही अशी बाब आहे जिथे विवेकाचा वापर केला पाहिजे.”
हेही वाचा:

Hemant Soren Resignation : बिग ब्रेकिंग! हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्‍यमंत्री
Hemant Soren | झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आणखी एक धक्का, याचिकेवरील सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
Delhi AAP Protest : दिल्लीत ‘आप’चे भाजपच्या मुख्यालयासमोर आंदोलन; तणावाची परिस्थिती

 
 
The post ब्रेकिंग न्यूज: ‘झामुमो’ नेते चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध appeared first on Bharat Live News Media.

Go to Source