Crime News : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करणारा अखेर जेरबंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून लुटणार्‍याचा प्रयत्न करणार्‍या दोन सराइतांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, दोन काडतुसे असा एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सराफी पेढी बंद करताना हा गोळीबार केला होता. शरद बन्सीलाल मल्लाव (वय 24, रा. काची आळी, शिरूर जि. … The post Crime News : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करणारा अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Crime News : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करणारा अखेर जेरबंद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून लुटणार्‍याचा प्रयत्न करणार्‍या दोन सराइतांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, दोन काडतुसे असा एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सराफी पेढी बंद करताना हा गोळीबार केला होता. शरद बन्सीलाल मल्लाव (वय 24, रा. काची आळी, शिरूर जि. पुणे), सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय-23, रा. धायरी पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे आदी उपस्थित होते.
शिरूरमधील सुभाष चौकात जगन्नाथ सराफ कोलथे सराफ नावाने दुकान आहे. दुकानाचे मालक अशोक कोलथे आणि कामगार भिका एकनाथ पंडित हे 28 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलाच्या धाकाने दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामगार भिका पंडित यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पंडित यांना पिस्तुलाची बट डोक्यात मारून गोळीबार केला होता. याप्रकरणी भिका एकनाथ पंडित (वय 50, रा. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला गोपनीय माहितीचे आधारे हा गुन्हा सराईत गुन्हेगार शरद मल्लाव याने त्याचा साथीदार सागर सोनलकर यांच्या दतीने केला असल्याचे समजले. तपास पथकाने सिंहगड किल्ला परिसरातील जंगलातून दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी हे रेकोर्डवरील असून, शरद मल्लाव याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून आरोपी शरदला एक वर्षासाठी हद्दपार केले होते. तरीही त्याने जिल्ह्यात येऊन गुन्हा केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अक्षय सुपे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा

साखर उद्योगासह सहकाराची निराशा, सहकारी बँकिंग क्षेत्राचाही अपेक्षाभंग
Nashik | नांदूरमध्यमेश्वर पाणथळ क्षेत्राचे आरोग्य धोक्यात
लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त

Latest Marathi News Crime News : सराफ व्यावसायिकावर गोळीबार करणारा अखेर जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.