Crime News : महिलांचे दागिने हिसकावणार्या टोळीवर ‘मोक्का’
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्या अरमान नानावत व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. मावळते पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही 116 वी कारवाई होती. आयुक्तांनी 13 महिन्यांच्या कार्यकाळात शहरात दहशत पसरवणार्या गुन्हेगारांवर मोक्का, तडीपारी, एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. यापूर्वी झालेल्या 114 मोक्काच्या कारवाईचे रेकॉर्ड त्यांनी तोडले आहे.
टोळी प्रमुख अरमान नानावत (वय 22, रा. पोटफोडे वस्ती, सोनी गोडाऊन मागे, वढु खुर्द) व त्याचा साथीदार ओंकार रामकिसन गायकवाड (वय 20, रा. चाकण रोड, शिक्रापूर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. अरमान नानावतने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून गुन्हे केले आहेत. मागील 10 वर्षांत जबरी चोरी, कट अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, संघर्ष चौकातून कपडे खरेदीला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंद होता.
गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संघटित गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयारकरून परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोक्का कारवाईला मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा
लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त
Pune News : नव्या पोलिस आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर !
Pune : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदांचा धडाका
Latest Marathi News Crime News : महिलांचे दागिने हिसकावणार्या टोळीवर ‘मोक्का’ Brought to You By : Bharat Live News Media.