इंदापुरात केळीचे निर्यातक्षम उत्पादनाकडे कल
बावडा : पुढारी वृत्तसेवा : निर्यातक्षम केळीला प्रतिकिलोस सुमारे 35 रुपयांपर्यंत विक्रमी भाव यापूर्वी मिळाला आहे. त्यामुळे निर्यातक्षम
केळी पिकाचे उत्पादन घेण्याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून केळीला उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने या पिकाचा शेतकर्यांना आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील प्रगतशील बागायतदार दत्तात्रय सोपान घोगरे यांनी ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात पाण्याची कमतरता असताना 5 एकर क्षेत्रावर केळीची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला. वेळेवर आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन केल्याने केळीचे पीक उत्कृष्ट आले.
सध्या केळीबागेत घडाची वेण सुरू आहे. केळीला परदेशातून कायम मोठी मागणी असल्याने बागेतून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणार असल्याचे दत्तात्रय घोगरे यांनी सांगितले. बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी दत्तात्रय घोगरे यांना रणजित घोगरे व कृषी अधिकारी अजित घोगरे या दोन्ही मुलांचे मार्गदर्शन लाभत आहे. केळीचा सुमारे 86 टक्के उपयोग खाण्याकरिता होतो. केळीपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ निर्माण केले जातात. केळी उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक असल्याचे कृषी अधिकारी अजित घोगरे यांनी नमूद केले. केळीबागेचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केल्यास चांगले उत्पादन मिळते. परिणामी, सध्या केळी पिकाचा शेतकर्यांना चांगला आर्थिक आधार प्राप्त झाल्याचे या वेळी रणजित घोगरे यांनी सांगितले.
The post इंदापुरात केळीचे निर्यातक्षम उत्पादनाकडे कल appeared first on पुढारी.
बावडा : पुढारी वृत्तसेवा : निर्यातक्षम केळीला प्रतिकिलोस सुमारे 35 रुपयांपर्यंत विक्रमी भाव यापूर्वी मिळाला आहे. त्यामुळे निर्यातक्षम केळी पिकाचे उत्पादन घेण्याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून केळीला उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने या पिकाचा शेतकर्यांना आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील प्रगतशील बागायतदार दत्तात्रय सोपान घोगरे यांनी …
The post इंदापुरात केळीचे निर्यातक्षम उत्पादनाकडे कल appeared first on पुढारी.