लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहियानगरमधील नागरिकांना आता थेट ड्रेनेजच्या पाण्यातच वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील घरांमध्ये सातत्याने ड्रेनेजचे पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून त्यावर कार्यवाही करण्याऐवजी क्षेत्रिय कार्यालय आणि ड्रेनेज विभाग मात्र एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मध्यवस्तीतील महात्मा फुले वाड्यापासूनच्या परिसरातील ड्रेनेजचे पाणी लोहियानगर येथील ओढ्याला … The post लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त appeared first on पुढारी.

लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोहियानगरमधील नागरिकांना आता थेट ड्रेनेजच्या पाण्यातच वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील घरांमध्ये सातत्याने ड्रेनेजचे पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून त्यावर कार्यवाही करण्याऐवजी क्षेत्रिय कार्यालय आणि ड्रेनेज विभाग मात्र एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मध्यवस्तीतील महात्मा फुले वाड्यापासूनच्या परिसरातील ड्रेनेजचे पाणी लोहियानगर येथील ओढ्याला येऊन मिळते. मात्र, लोहियानगर मधील गल्ली 1 ते 6 मधील या ड्रेनेज लाईनमधील पाणी सातत्याने बाहेर निघते.
त्यामुळे एका गल्लीतील किमान 15 ते 20 घरांमध्ये हे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घाणीच्या पाण्यातच नागरिकांना वावर करावा लागत आहे. त्यामुळे हे नागरिक त्रस्त झाले आहे. याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडे पाठपुरावा केला असता ड्रेनेज विभागाकडे बोट दाखविले जाते तर ड्रेनेज विभाग मात्र हे काम क्षेत्रिय कार्यालयाचे असल्याचे सांगते असा आरोप येथील रहिवाशांनी केला. दरम्यान महापालिका आयुक्तांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन येथील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतुद करावी, अशी मागणी माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा

ED Summons To CM Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पाचव्यांदा ED समन्स धुडकावले
Pune News : नव्या पोलिस आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर !
धक्कादायक ! चुलत काकाकडूनच पुतणीवर कुकर्म

Latest Marathi News लोहियानगरमधील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी; नागरीक त्रस्त Brought to You By : Bharat Live News Media.