पुणे : अखेर ‘ते’ होर्डिंग जमिनदोस्त..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे उभारलेले बेकायदेशीर होर्डिंग महापालिकेने अखेर जमिनदोस्त केले. कारवाईला स्थगिती देण्याची होर्डिंगमालकाची मागणी महापालिका न्यायालयाने नाकारल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. याबाबत पाठपुरावा करून दैनिक ‘पुढारी’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले. संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभारले होते. हा … The post पुणे : अखेर ‘ते’ होर्डिंग जमिनदोस्त.. appeared first on पुढारी.

पुणे : अखेर ‘ते’ होर्डिंग जमिनदोस्त..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे उभारलेले बेकायदेशीर होर्डिंग महापालिकेने अखेर जमिनदोस्त केले. कारवाईला स्थगिती देण्याची होर्डिंगमालकाची मागणी महापालिका न्यायालयाने नाकारल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. याबाबत पाठपुरावा करून दैनिक ‘Bharat Live News Media’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले.
संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग एकत्र करून एकच मोठे होर्डिंग उभारले होते. हा प्रकार उजेडात आल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहिरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, या प्रकरणात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले होते. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले आहेत. याबाबत सर्वप्रथम दैनिक Bharat Live News Mediaने प्रकाश टाकला होता. या होर्डिंगवर कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतरही क्षेत्रीय कार्यालयाने किंवा आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाई केली जात नव्हती. दुसरीकडे होर्डिंग वाचवण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाने जागा वाटप नियमावलीला मूठमाती देत ही जागा संबंधित होर्डिंग व्यावसायिकाला 11 महिने मुदतीने भाड्याने देण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.
यासंदर्भात दैनिक Bharat Live News Mediaने पुन्हा वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या होर्डिंगसंदर्भात इतर कोणताही प्रस्ताव सादर न करता, हे होर्डिंग पाडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत. होर्डिंगवर कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेवून होर्डिंगमालकाने कारवाईस स्थगिती मिळवण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी सकाळी सहा वाजता या बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई केली.
संबंधित होर्डिंगसंदर्भात अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यामुळे होर्डिंगवर कारवाई केली जाणार होती. कारवाईला स्थगिती देण्यासाठी संबंधीत होर्डिंगमालक महापालिकेच्या न्यायालयात गेला होता. न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर आम्ही कारवाई केली. कारवाईसाठी येणारा खर्च अनामत रकमेतून वसूल केला जाणार आहे.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

हेही वाचा

‘क्लायमेट चेंज’मुळे जीवसृष्टीच ‘आयसीयू’त : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत
Pune News : नव्या पोलिस आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर !
सर्वात मोठे इलेक्ट्रिक विमान 2033 मध्ये झेपावणार आकाशात

Latest Marathi News पुणे : अखेर ‘ते’ होर्डिंग जमिनदोस्त.. Brought to You By : Bharat Live News Media.