अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवात; पारंपरिक वेशभुषेतील बालकलाकार वेधले लक्ष
जळगाव : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क
अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवात झाली असून अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर यंदाच्या साहित्य संमेलनात करण्यात आला आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार, दि. २ रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे सुरु झाले असून संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भुषविले आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होत आहे. . तर पहा फोटो….
साहित्य संमेलन ध्वजारोहण
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशव्दारावर विविध अश्वारूढ रथांवर बालकलाकारांनी पारंपरिक साकार रुपे परिधान केली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाजवळ बहिणाबाई चौधरी व साने गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले आहे. तसेच जळगावची प्रसिध्द केळीच्या झाडापासून आकर्षक असे कोरीवकाम केलेले खांब सजविण्यात आले असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे.
Latest Marathi News अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवात; पारंपरिक वेशभुषेतील बालकलाकार वेधले लक्ष Brought to You By : Bharat Live News Media.