सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, पण Paytm शेअर्सची झाली आणखी वाईट अवस्था
Bharat Live News Media ऑनलाईन : अंतरिम अर्थसंकल्पाच्या दिवसाच्या घसरणीतून सावरत शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल ८४१ अंकांनी वाढून ७२,४०० पार झाला. तर निफ्टीने २५० अंकांनी वाढून २१,९४० चा टप्पा ओलांडला. आशियाई बाजारातून सकारात्मक संकेत तसेच बँक आणि आयटी शेअर्समधील मजबूत वाढीमुळे भारतीय बाजारातील निर्देशांक शुक्रवारी हिरव्या रंगात उघडले. (Sensex Nifty Today)
सेन्सेक्स आज ७१,९७७ वर खुला झाला. त्यानंतर तो ७२,५४३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, इन्फोसिस, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, एनटीपीसी हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर मारुतीचा शेअर्स किरकोळ घसरला आहे.
निफ्टीवर अदानी पोर्टस, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस हे सर्वाधिक वाढले आहेत. तर आयशर मोटर्स, मारुती, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स घसरले.
निफ्टी बँक सुमारे १ टक्क्याने वाढून ४६,६०० जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी बँकमध्ये पीएनबीचा शेअर टॉप गेनर आहे. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बंधन बँक यांचे शेअर्सही वधारले आहेत.
Paytm ला सलग दुसऱ्या दिवशी फटका
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स कालच्या २० टक्क्यांच्या घसरणीनंतर बीएसईवर आज आणखी २० टक्क्यांनी खाली येऊन ४८७ रुपयांवर आला. (One97 Communications Share Price) रिझर्व्ह बँक इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन क्रेडिट आणि डिपॉझिट ऑपरेशन्स, टॉप-अप्स, फंड ट्रान्सफर आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स फेब्रुवारी अखेरीस थांबवण्यास सांगितल्यानंतर वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स काल २० टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किटमध्ये गेले होते. आज पुन्हा हा शेअर्स २० टक्क्यांनी घसरला.
जागतिक बाजार
गुरुवारी देशांतर्गत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी कमी पातळीवर बंद झाले होते. यूएस फेडने व्याजदर जैसे थे कायम ठेवून लवकर दर कपात करणार नसल्याचे संकेत आहे. यामुळे जागतिक भावनावर गुरुवारी त्याचा परिणाम दिसून आला होता. पण रोजगाराच्या अहवालांवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे गुरुवारी अमेरिकेच्या बाजारातील निर्देशांक वाढून बंद झाले. डाऊ जोन्स ०.९७ टक्के, एस अँड पी १.२५ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट १.३० टक्क्यांनी वाढला.
परदेशी गुंतवणूकदार
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गुरुवारी १,८७९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. दरम्यान, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ८७२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
हे ही वाचा :
Paytm अडचणीत, शेअर्स २० टक्क्यांनी गडगडले, कारण काय?
बजेटचा सेन्सेक्स, निफ्टीवर काय परिणाम? आज बाजारात काय घडलं?
Budget 2024 : महिला, शेतकरी, गरिबांवर मेहेरनजर
The post सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला, पण Paytm शेअर्सची झाली आणखी वाईट अवस्था appeared first on Bharat Live News Media.