दाल फ्रायला चक्क सोन्याचा तडका; एक वाटीची किंमत तब्‍बल २५ हजार रूपये

दुबई : दाल फ्राय हा पदार्थ भारत आणि भारताबाहेरही अनेक खवय्यांचा आवडता पदार्थ आहे. लसूण आणि मिरचीचा तडका म्हणजेच खमंग फोडणी दिलेला हा पदार्थ अनेक लोक मिटक्या मारत खातात. दुबईत एका ठिकाणी असा दाल फ्राय चक्क 24 कॅरेट सोन्याची फोडणी घालून मिळतो! ‘24 कॅरेट गोल्ड दाल फ्राय’ नावाची ही डिश तिथे लोकप्रिय ठरत आहे. इन्स्टाग्रामवर … The post दाल फ्रायला चक्क सोन्याचा तडका; एक वाटीची किंमत तब्‍बल २५ हजार रूपये appeared first on पुढारी.

दाल फ्रायला चक्क सोन्याचा तडका; एक वाटीची किंमत तब्‍बल २५ हजार रूपये

दुबई : दाल फ्राय हा पदार्थ भारत आणि भारताबाहेरही अनेक खवय्यांचा आवडता पदार्थ आहे. लसूण आणि मिरचीचा तडका म्हणजेच खमंग फोडणी दिलेला हा पदार्थ अनेक लोक मिटक्या मारत खातात. दुबईत एका ठिकाणी असा दाल फ्राय चक्क 24 कॅरेट सोन्याची फोडणी घालून मिळतो! ‘24 कॅरेट गोल्ड दाल फ्राय’ नावाची ही डिश तिथे लोकप्रिय ठरत आहे.
इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या एक वाटी दालफ्रायची किंमत तब्बल 25 हजार रुपये इतकी आहे. दुबईतील बुर्ज अल अरब या रेस्टॉरंटमध्ये ही दाल फ्राय देण्यात येते. इथे अन्यही अनेक पदार्थ लोकांच्या आवडीचे आहेत. शिवाय हे रेस्टॉरंटच अतिशय सुंदररीत्या सजवलेले असल्यानेही लोकांच्या कुतुहलाचा विषय असते. या रेस्टॉरंटच्या इंटेरिअर डिझायनिंगमध्येही सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. कॉकटेल, कॅपुचिनो, बर्गर व अन्यही काही पदार्थांमध्ये याठिकाणी सोन्याचा वापर केला जातो.
Latest Marathi News दाल फ्रायला चक्क सोन्याचा तडका; एक वाटीची किंमत तब्‍बल २५ हजार रूपये Brought to You By : Bharat Live News Media.