पुणे : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदांचा धडाका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची  आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने निविदा मागवण्याचा धुमधडाका सुरू केला आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या 100 कोटीच्या तब्बल 121 निविदांच्या जाहिराती बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदांना अंतिम स्वरूप देण्यासाठी 25 फेब्रुवारीपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. लोकसभा … The post पुणे : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदांचा धडाका appeared first on पुढारी.

पुणे : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदांचा धडाका

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची  आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने निविदा मागवण्याचा धुमधडाका सुरू केला आहे. महापालिकेच्या विविध विभागांच्या 100 कोटीच्या तब्बल 121 निविदांच्या जाहिराती बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदांना अंतिम स्वरूप देण्यासाठी 25 फेब्रुवारीपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून 25 फेब्रुवारीनंतर केव्हाही निवडणुकीची घोषणा होउ शकते. जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. तर महापालिका आयुक्तांनी देखिल महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद असलेल्या कामांच्या निविदा व वर्कऑर्डर 20 ते 25 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

त्यानुसार महापालिकेच्या विविध विभागांनी निविदा काढण्याचा धडका लावला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसापासुन पालिकेच्या टेंडर सेल विभागात निविदाची लगीन घाई सुरू आहे. मागील दोन दिवसात म्हणजे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी विविध कामांच्या जवळपास 100 कोटीच्या 121 निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या या निविदा ’मार्चएंड’च्या पूर्वी केवळ निधी संपवण्यासाठी वाटेल त्या कामाच्या काढल्या जात आहेत. मोठ्या निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी जावू नयेत, म्हणून त्या तुकड्या तुकड्यात काढण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

महापालिका प्रशासनाने मागील दोन दिवसात 121 निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मार्चअखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. निधी संपवायचा म्हणून वाट्टेल ती कामे काढणे, मोठी निविदा तुकड्या तुकड्यात काढणे वगैरे उद्योग प्रशासकाच्या काळातही पूर्वी होते तसेच किंवा थोडे जास्तच सुरू आहेत.

– विजय कुंभार, आप.

हेही वाचा

पायाभूत विकासातून विकसित भारत
समतोल अर्थसंकल्प
पुणे-मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी

Latest Marathi News पुणे : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदांचा धडाका Brought to You By : Bharat Live News Media.