आता समुद्रात ‘संध्याक’ची करडी नजर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नौदलाच्या ताफ्यात संध्याक हे जहाज शनिवारी दाखल करण्यात येत आहे. बंदरे, सागरी किनार्‍यांसह खोल समुद्राचे सर्वेक्षण करण्यासह सागरी हद्दीतील शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास या जहाजामुळे मदत होणार आहे. विशाखापट्टणम येथील नौदलाच्या ताफ्यात संध्याक हे टेहळणी जहाज दाखल करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख आर. हरीकुमार आदी मान्यवरांच्या … The post आता समुद्रात ‘संध्याक’ची करडी नजर appeared first on पुढारी.

आता समुद्रात ‘संध्याक’ची करडी नजर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय नौदलाच्या ताफ्यात संध्याक हे जहाज शनिवारी दाखल करण्यात येत आहे. बंदरे, सागरी किनार्‍यांसह खोल समुद्राचे सर्वेक्षण करण्यासह सागरी हद्दीतील शत्रू राष्ट्रांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास या जहाजामुळे मदत होणार आहे.
विशाखापट्टणम येथील नौदलाच्या ताफ्यात संध्याक हे टेहळणी जहाज दाखल करण्यात येणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख आर. हरीकुमार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी संध्याकचे अनावरण होणार आहे. संध्याकच्या समुद्री चाचण्या पार पडल्यानंतर डिसेंबर महिन्यात हे जहाज नौदलाच्या हवाली करण्यात आले होते. समुद्रतट, खोल समुद्र, बंदर आदी ठिकाणी या जहाजामार्फत टेहळणी करण्यात येणार आहे. नौदलाच्या सागरी मोहिमांना या जहाजामुळे बळ मिळणार असून जवानांसह नौदल अधिकार्‍यांना सुरक्षा मिळणार आहे. संध्याकमध्ये उपग्रहीय यंत्रणेसह अत्याधुनिक सुविधा असणार आहे. यामुळे महासागरातील दूरवरच्या टापूतील संशयास्पद हालचाली टिपता येणार आहेत.
या जहाजाचा पाण्यातील वेग साधारण 18 नॉटस्पर्यंत असेल. आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट समोर ठेवून या जहाजाची बांधणी करण्यात आली आहे. यासाठी स्वदेशी बनावटीच्या 80 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतीय जहाज बांधणीच्या सामर्थ्याचे दर्शन संध्याकमधून होणार आहे. या जहाजाचे विस्थापित वजन 3400 टन असून लांबी 110 मीटर आहे.
Latest Marathi News आता समुद्रात ‘संध्याक’ची करडी नजर Brought to You By : Bharat Live News Media.