पुष्परचनेतील सौंदर्यदृष्टी

फुले घर आणि जीवनही फुलवतात. घराला फुलांनी सजविणे हीदेखील एक कला आहे. फुलांचे गुच्छ तोडून असेच फुलदाणीत ठेवून दिल्याने त्याचे सौंदर्य वाढत नाही. सुंदर सजविल्यानेच फुलदाणीचे सौंदर्य वाढते. फुलांची सजावट करताना खालील गोष्टी लक्षात घ्या. फिक्या रंगाच्या फुलांसाठी फिक्या रंगाची पाने आणि गडद रंगाच्या फुलांसाठी गडद रंगाची पाने वापरा. पुष्परचना करताना दीर्घकाळ ताजी राहतील अशीच … The post पुष्परचनेतील सौंदर्यदृष्टी appeared first on पुढारी.

पुष्परचनेतील सौंदर्यदृष्टी

अवंती कारखानीस

फुले घर आणि जीवनही फुलवतात. घराला फुलांनी सजविणे हीदेखील एक कला आहे. फुलांचे गुच्छ तोडून असेच फुलदाणीत ठेवून दिल्याने त्याचे सौंदर्य वाढत नाही. सुंदर सजविल्यानेच फुलदाणीचे सौंदर्य वाढते. फुलांची सजावट करताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
फिक्या रंगाच्या फुलांसाठी फिक्या रंगाची पाने आणि गडद रंगाच्या फुलांसाठी गडद रंगाची पाने वापरा. पुष्परचना करताना दीर्घकाळ ताजी राहतील अशीच फुले हाताने न तोडता धारदार चाकूने तोडा. फुले निवडताना फुलदाणीचा आकार लक्षात घ्या. फुलदाणी लहान असेल तर लहान दांडीची फुले निवडा आणि मोठी असतील तर मोठ्या दांडीची फुले निवडा.
पसरट आणि मोठ्या आकाराच्या फुलदाणीसाठी पसरट आणि मोठ्या आकाराची फुले निवडा. एकाच वेळी जास्त रंगाची फुले ठेवण्यापेक्षा दोन-तीन रंगांची फुले ठेवा. फुले अधिक काळासाठी ताजी राहण्यासाठी ती काही वेळ थंड जागेत ठेवा. फुलदाणीच्या पाण्यात थोडी साखर, मीठ आणि डेटॉलचे काही थेंब टाका. यामुळे फुले जास्त काळ ताजी राहतात.
सुगंधी फुलांना 10 मिनिटे थंड पाण्यात ठेवून नंतर फुलदाणीत सजवा. यामुळे सुगंध जास्त काळ टिकतो. तांब्याच्या फुलदाणीत फुले लवकर कोमेजत नाहीत. तांब्याची फुलदाणी नसेल तर फुलदाणीत तांब्याची नाणी टाका.
The post पुष्परचनेतील सौंदर्यदृष्टी appeared first on पुढारी.

फुले घर आणि जीवनही फुलवतात. घराला फुलांनी सजविणे हीदेखील एक कला आहे. फुलांचे गुच्छ तोडून असेच फुलदाणीत ठेवून दिल्याने त्याचे सौंदर्य वाढत नाही. सुंदर सजविल्यानेच फुलदाणीचे सौंदर्य वाढते. फुलांची सजावट करताना खालील गोष्टी लक्षात घ्या. फिक्या रंगाच्या फुलांसाठी फिक्या रंगाची पाने आणि गडद रंगाच्या फुलांसाठी गडद रंगाची पाने वापरा. पुष्परचना करताना दीर्घकाळ ताजी राहतील अशीच …

The post पुष्परचनेतील सौंदर्यदृष्टी appeared first on पुढारी.

Go to Source