आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सव; बडे नेते होणार सहभागी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गीता परिवारातर्फे आळंदीत 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गीताभक्ती अमृत-महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित केला आहे. महोत्सवात श्री श्री रवीशंकर, स्वामी रामदेव, योगी आदित्यनाथ, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, … The post आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सव; बडे नेते होणार सहभागी appeared first on पुढारी.

आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सव; बडे नेते होणार सहभागी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गीता परिवारातर्फे आळंदीत 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान गीताभक्ती अमृत-महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त आयोजित केला आहे.
महोत्सवात श्री श्री रवीशंकर, स्वामी रामदेव, योगी आदित्यनाथ, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी सहभागी होणार असल्याची माहिती गीता परिवाराचे डॉ. संजय मालपाणी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवात 450 हून अधिक कलाकारांचे सादरीकरण, 11 हजार विद्यार्थ्यांद्वारे भगवद्गीता आणि वेदांचे पठण, 2000 हून अधिक वैदिक गुरुंचा 81 कुंडीय महायज्ञ, दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सन्मान होणार आहे.
हेही वाचा

तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार : मुख्यमंत्री शिंदे
Water and Healthy Life : निरोगी जीवनासाठी पाण्याचे योगदान
बॅसिन कॅथलिक को-ऑप. बँकेच्या चौकशीचे आदेश

Latest Marathi News आळंदीत गीताभक्ती अमृतमहोत्सव; बडे नेते होणार सहभागी Brought to You By : Bharat Live News Media.