सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलावर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात चौथ्या दिवशी गुरुवारी किरणोत्सव पूर्णक्षमतेने पार पडला. सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सूर्यकिरणे श्री अंबाबाई मूर्तीच्या चेहर्‍यावर पडली. सूर्यकिरणांच्या तेजामुळे देवीचा चेहरा उजळून निघाला. तब्बल दहा वर्षांनी देवीच्या चेहर्‍यावर तीव—तेने किरणे पडल्याचा हा क्षण भाविकांना अनुभवायला मिळाला. बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस किरणोत्सव पूर्णक्षमतेने … The post सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलावर appeared first on पुढारी.

सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलावर

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात चौथ्या दिवशी गुरुवारी किरणोत्सव पूर्णक्षमतेने पार पडला. सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सूर्यकिरणे श्री अंबाबाई मूर्तीच्या चेहर्‍यावर पडली. सूर्यकिरणांच्या तेजामुळे देवीचा चेहरा उजळून निघाला. तब्बल दहा वर्षांनी देवीच्या चेहर्‍यावर तीव—तेने किरणे पडल्याचा हा क्षण भाविकांना अनुभवायला मिळाला. बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला. त्यानंतर देवीची विधिवत आरती पार पडली.
दि. 29 जानेवारीपासून उत्तरायण कालखंडातील पाच दिवसां च्या किरणोत्सवास सुरुवात झाली. पहिले दोन दिवस भाविकांची काहीशी निराशा झाली. तिसर्‍या दिवशी बुधवारी 6 वाजून 18 मिनिटांनी सूर्यकिरणांच्या अभिषेकाने देवीचे मुखमंडल उजळून गेले. गुरुवारी 6 वाजून 17 मिनिटांनी किरणांनी देवीच्या चेहर्‍याला स्पर्श केल्याने भाविक आनंदून गेले.
असा झाला किरणोत्सव सायंकाळी 5 वा. 28 मिनिटे :
* सूर्यकिरणांचा महाद्वारातून मंदिरात प्रवेश
* 5 वा.33 मिनिटे : सूर्यकिरणे गरुड मंडपाच्या मध्यभागी पोहोचली.
* 6.05 वाजता : सूर्यकिरणे पितळी उंबरठ्यापर्यंत पोहोचली.
* 6.08 वाजता : सूर्यकिरणे चांदीच्या उंबर्‍यापर्यंत पोहोचली.
* 6.14 वाजता : किरणांचा श्री अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श.
* 6.17 ते 6.18 दरम्यान : सूर्यकिरणांनी देवीचा चेहरा उजळून गेला. त्यानंतर किरणे लुप्त झाली.
Latest Marathi News सूर्यकिरणे देवीच्या मुखकमलावर Brought to You By : Bharat Live News Media.