चार वर्षांपासून एकाकी मादी शार्कने दिला पिल्लांना जन्म

शिकागो : काही प्राणी अपवादात्मक स्थितीत अलैंगिक प्रजननही करीत असतात. त्यामध्ये मादी नराशी संबंधाशिवायच पिल्लांना जन्म देते व ही पिल्ली मादीच असतात. अशा प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रजातीच्या अजगरांपासून ते अगदी मगर व माशांपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. आता अमेरिकेत शिकागो येथील प्रसिद्ध प्राणी संग्रहालयात असाच प्रकार घडला आहे. गेल्या चार वर्षांपासून एकट्याच असलेल्या एका मादी शार्कने … The post चार वर्षांपासून एकाकी मादी शार्कने दिला पिल्लांना जन्म appeared first on पुढारी.

चार वर्षांपासून एकाकी मादी शार्कने दिला पिल्लांना जन्म

शिकागो : काही प्राणी अपवादात्मक स्थितीत अलैंगिक प्रजननही करीत असतात. त्यामध्ये मादी नराशी संबंधाशिवायच पिल्लांना जन्म देते व ही पिल्ली मादीच असतात. अशा प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रजातीच्या अजगरांपासून ते अगदी मगर व माशांपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. आता अमेरिकेत शिकागो येथील प्रसिद्ध प्राणी संग्रहालयात असाच प्रकार घडला आहे. गेल्या चार वर्षांपासून एकट्याच असलेल्या एका मादी शार्कने पिलांना जन्म दिला आहे.
शिकागो, इलिनॉय येथील ब्रूकफिल्ड प्राणी संग्रहालयात हा प्रकार घडला आहे. ही मादी शार्क गेल्या चार वर्षांपासून एकटीच राहत होती. या मादी शार्कसह येथे एकही नर शार्क नव्हता. असं असताना या मादी शार्कने पिलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारामुळे प्राणी संग्रहालयात एकच खळबळ उडाली आहे. नराशी संबंध न ठेवता मादी शार्कने पिलांना जन्म दिल्याने हे कसं काय घडलं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. या मादी शार्कने पिलांना जन्म दिल्यानंतर अनेक महिने प्राणी संग्रहालय प्रशासनाने ही गोष्ट अनेक महिने लपवून ठेवली.
प्राणी संग्रहालय प्रशासनाने मादी शार्कसह तिच्या पिल्लांची विशेष काळजी घेतली. या प्रजनन प्रक्रियेला ‘व्हर्जिन बर्थ’ असे म्हणतात. पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहे. यापैकी काही जीव असे आहेत जे शरीरसंबंध न ठेवता प्रजनन करतात. शुक्राणूशिवाय मादी गर्भवती होते. वैज्ञानिक भाषेत याला ‘पार्थेनोजेनेसिस’ म्हणतात. शार्क सारख्या पृष्ठवंशी प्राण्यांसाठी व्हर्जिन जन्म ही एक दुर्मीळ घटना आहे. खूप कमी जीवांमध्ये शरीर संबंध न ठेवता जीव निर्माण करण्याची दुर्मीळ क्षमता असते. काही पक्षी, शार्क, सरडे, साप अनेकदा वर्षानुवर्षे एकटे राहतात. यामुळे ते व्हर्जिन बर्थ प्रक्रियेद्वारे नवा जीव निर्माण करतात. स्वत:चाच जणू क्लोन तयार करून हे नवा जीव जन्माला घालतात.
The post चार वर्षांपासून एकाकी मादी शार्कने दिला पिल्लांना जन्म appeared first on पुढारी.

शिकागो : काही प्राणी अपवादात्मक स्थितीत अलैंगिक प्रजननही करीत असतात. त्यामध्ये मादी नराशी संबंधाशिवायच पिल्लांना जन्म देते व ही पिल्ली मादीच असतात. अशा प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रजातीच्या अजगरांपासून ते अगदी मगर व माशांपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. आता अमेरिकेत शिकागो येथील प्रसिद्ध प्राणी संग्रहालयात असाच प्रकार घडला आहे. गेल्या चार वर्षांपासून एकट्याच असलेल्या एका मादी शार्कने …

The post चार वर्षांपासून एकाकी मादी शार्कने दिला पिल्लांना जन्म appeared first on पुढारी.

Go to Source