रोहित पवारांची ईडी चौकशी संपली, कार्यालयातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी साधला संवाद
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडीच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचे मत व्यक्त केली. तब्बल आठ तास त्यांची चौकशी सुरु होती. त्यांना चौकशीला बोलावल्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. ईडीच्या चौकशी संपल्यानंतर पवार यांनी कार्यकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
२४ तारखेची चौकशीनंतर रोहित पवार म्हणाले होते की, १ तारखेला मला परत बोलावलं आहे. जी माहिती त्यांनी मागवली आहे ती माहिती मी दिलेली आहे. १ तारखेला अतिरिक्त माहिती मागवलेली आहे, तीही मी देणार आहे. मी आधी व्यावसायात आलो मग राजकारणात आलो. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर व्यावसायात आले. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी का आम्हाला प्रश्न करायचा, हा माझा प्रश्न आहे असा सवाल रोहित पवार यांनी पहिल्या चौकशीनंतर केला होता.
हेही वाचा
One Nation One Election : शिवसेना शिंदे गटाचा एक देश एक निवडणुकीला पाठिंबा
Latest Marathi News रोहित पवारांची ईडी चौकशी संपली, कार्यालयातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी साधला संवाद Brought to You By : Bharat Live News Media.