गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवत सर्वस्पर्शी बजेट : रावसाहेब दानवे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्व वर्गांना स्पर्श करणारा आहे. विशेषतः गरीब, युवा, शेतकरी, महिला यांना केंद्रस्थानी ठेवत सादर केलेला हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २२ जानेवारीला अयोध्या … The post गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवत सर्वस्पर्शी बजेट : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवत सर्वस्पर्शी बजेट : रावसाहेब दानवे

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्व वर्गांना स्पर्श करणारा आहे. विशेषतः गरीब, युवा, शेतकरी, महिला यांना केंद्रस्थानी ठेवत सादर केलेला हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, १ कोटी गरिबांच्या घरावर सोलर पॅनल बसवणार आहे. देशातील पारंपरिक उर्जास्त्रोत वापरण्यास यामुळे मोठ्या प्रामाणात सुरूवात होईल. तसेच आपले सरकार २ कोटी नवीन घरांची निर्मिती करणार आहे. ‘आयुष्यमान भारत योजने’ चा देखील विस्तार केला जाणार असून ३ कोटी महिलांना लक्षाधीश बनवणार आहे, मध्यम वर्गातील नागरिकांना स्वतःची घरे बांधण्यास विशेष सहाय्य योजनेद्वारे करणार आहे.
पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, रेल्वे प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. रेल्वे नवीन ४० हजार वंदे भारत कोच बनवणार आहे. रेल्वे हाय डेनसिटी ट्रॅफिक कॉरिडॉर बनवणार आहे. रेल्वेच्या सर्वतोपरी विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. २०४७ साली स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या दृष्टीने नवीन पायाभुत सुविधा उभ्या करण्यासाठी देशाला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. असेही मंत्री दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा : 

महाराष्ट्रात रेल्वेची १५ हजार ५५४ कोटींची गुंतवणूक

Budget 2024 : सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प : डॉ. आशिष देशमुख
Budget 2024 : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच : अनिल देशमुख

Latest Marathi News गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवत सर्वस्पर्शी बजेट : रावसाहेब दानवे Brought to You By : Bharat Live News Media.