धाराशिव: राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा रास्ता रोको

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासोबतच दूध दर, वीज पुरवठा नियमित करणे, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. Dharashiv NCP यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र व … The post धाराशिव: राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

धाराशिव: राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा रास्ता रोको

धाराशिव, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासोबतच दूध दर, वीज पुरवठा नियमित करणे, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. Dharashiv NCP
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील आ. जयंत पाटील, आ. रोहित पवार व इतर अनेक सहकाऱ्यांवर ईडी, सीबीआयमार्फत दबाव आणला जात आहे. सोयाबीन नगदी पीक कमी पावसामुळे हातचे निघून गेले. शेतीला पाणी, वीज, जनावरांना चारा नाही, मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व मजूर चिंताग्रस्त आहेत. याबाबत राज्य आणि केंद्र सरकार, जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांकडून लेखी निवेदने दिली आहेत. यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. Dharashiv NCP
याप्रसंगी राष्ट्रवादी नेते संजय निंबाळकर, शिवाजी सावंत, विठ्ठलराव माने, रमेश देशमुख, बालाजी डोंगे, अनिल जाधव, शामसुंदर पाटील, लक्ष्मणराव जाधव, महादेव पंडागळे, आदित्य पाटील, भारत शिंदे, अ‍ॅड. प्रविण शिंदे, मनोहर हरकल, औदूंबर धोंगडे, नानासाहेब जमदाडे, दत्तात्रय वाघमारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा 

धाराशिव: उमरगा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा
धाराशिव : दोन हजारांची लाच घेताना, दोन पोलिसांसह एकाला अटक
धाराशिव : कॅशिअरच्या डोक्याला पिस्टल लावून २ कोटींचे सोने लुटले

Latest Marathi News धाराशिव: राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा रास्ता रोको Brought to You By : Bharat Live News Media.