नागपूर : विरोधक संपविण्याचा भाजपचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, घंटानाद, सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सत्तेत तर शरद पवार गट सरकारविरोधात असे चित्र पुन्हा एकदा प्रकर्षाने पहायला मिळाले.
नागपुरातील व्हेरायटी चौकात शरद पवार गटातर्फे शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महागाई, बेरोजगारी कमी करण्याऐवजी जाणीवपूर्वक मविआ, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांना संपवण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी यावेळी केला.
माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, वेदप्रकाश आर्य, दिलीप पनकुले आदी नेते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा
Pimpri News : नागपूरचे अधिकारी चालवणार आयुक्तालयाचा कारभार ?
नागपूर : समृद्धी महामार्गावर पाठलाग करून २ कोटींची रोकड लुटली
नागपूर : सावनेरला भर बाजारात एटीएम फोडून १० लाख लंपास
Latest Marathi News नागपूर : विरोधक संपविण्याचा भाजपचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर Brought to You By : Bharat Live News Media.