झारखंडमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरच : चंपाई सोरेन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (‘ईडी’) अधिकार्यांनी बुधवारी अटक केली. तत्पूर्वी त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणाही झाली. आज (दि.१) चंपाई सोरेन यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. आम्ही राज्यपालांकडे सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. आता राज्यात लवकरच सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
चंपाई सोरेन यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड कशी झाली ?
जमीन घोटाळा प्रकरणी अटक करण्यापूर्वीच हेमंत सोरेन यांनी त्यांचे मोठे बंधू चंपाई सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याचे संकेत दिले होते. झारखंडमधील सत्ताधारी महाआघाडीच्या आमदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी सोरेन यांना JMM विधिमंडळ पक्षाचे सुप्रीमो म्हणून घोषित केले. हेमंत सोरेनचे वडील शिबू सोरेन यांच्यासह चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच ते हेमंत सोरेन यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हान भागातील आहेत. याच भागातून राज्यातला आतापर्यंत तीन मुख्यमंत्री मिळाले आहेत. अर्जुन मुंडा (2010 ते 2013) आणि रघुवर दास (2014 ते 2019) यांच्यासह काँग्रेसचे मधु कोडा हे याच भागातून येतात. मागील म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हानमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच चंपाई सोरेन यांना हेमंत सोरेन यांनी उत्तराधिकारी म्हणून निवडणे हा भाजपसाठी झारखंड मुक्ती मोर्चाने धक्कातंत्राचा वापर केल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘टायगर ऑफ कोल्हन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंपाई सोरेन हे कोल्हान भागात आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी होतील, असे मानले जात आहे
#WATCH | After meeting Jharkhand Governor CP Radhakrishnan, Leader of JMM legislative party, Champai Soren says “We have demanded that the process to start the formation of the Government should begin. He (Governor) said that the process will begin soon…” pic.twitter.com/AdED4ympMg
— ANI (@ANI) February 1, 2024
#WATCH | Ranchi, Jharkhand: Leader of JMM legislative party, Champai Soren leaves from Circuit House to meet Jharkhand Governor CP Radhakrishnan at the Raj Bhavan. pic.twitter.com/qJdcj7SKxb
— ANI (@ANI) February 1, 2024
हेमंत सोरेन यांच्यावर पुन्हा मुख्यमंत्रीपद सोडण्याची नामुष्की
२०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर भाजपचे अर्जुन मुंडा केंद्रात मंत्री झाली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकारचा विजय झाला. मात्र आता जमीन घोटाळा प्रकरणी अटक झाल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. आता त्यांचे बंधु चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. ते राज्याचे १२वे मुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी शक्यता आहे. मात्र सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी आपला कार्यकाळ पूर्ण करणयास हेमंत सोरेन अपयशी ठरले आहेत.
‘ईडी’च्या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेनांची सुप्रीम कोर्टात धाव
ईडीच्या अटक कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवार,२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली. ( Hemant Soren Judicial Custody)
ईडी चौकशीनंतर सोरेन तब्बल ३० तास नॉट रिचेबल
दोन दिवसांपूर्वी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर काही तास चौकशी केल्यानंतर ते सोरेन नॉचरिचेबल होते. तब्बल ३० तास नॉट रिचेबल असलेले सोरेन रांची येथील निवास्थानी पोहचले आणि त्यांनी पक्षातील आमदारांची बैठक घेतली. पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ईडी कोठडी सुनावली.
हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा भोवला
ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्कराच्या मालकीच्या ४.५५ एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना 14 ऑगस्ट 2023 रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर 20 जानेवारीला आठव्या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ईडीची कारवाई
या प्रकरणी 13 एप्रिल रोजी ईडीने झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 22 ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यात झारखंड कॅडर आयएएस छवी रंजन यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. रंजन हे यापूर्वी रांचीचे उपायुक्तही राहिले आहेत. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केली होती.
हेही वाचा :
23 वर्षांमध्ये १२ मुख्यमंत्री..! जाणून घ्या झारखंडमधील मुख्यमंत्री बदलाचा इतिहास
झारखंडचे मुख्यमंत्री साेरेन यांची ‘ईडी’ अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार
झारखंडचे मुख्यमंत्री चौकशीच्या फेर्यात, ‘ईडी’ पथक निवासस्थानी पोहोचले
Latest Marathi News झारखंडमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरच : चंपाई सोरेन Brought to You By : Bharat Live News Media.