नगर जिल्ह्यात 8 लाख 80 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणास दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जवळपास 8 लाख 80 हजार इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला. … The post नगर जिल्ह्यात 8 लाख 80 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

नगर जिल्ह्यात 8 लाख 80 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणास दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जवळपास 8 लाख 80 हजार इतक्या कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने घेतला. त्यानुसार राज्य शासनाने मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. या मोबाईल अ‍ॅप व प्रश्नावलीच्या माध्यमातून 23 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू झाले. पहिले दोन दिवस मात्र अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे सर्वेक्षणाचे कामाला म्हणावी अशी गती मिळाली नाही.
सर्वेक्षणाला गती मिळावी, यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप अपडेट केले. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या सहा दिवसांत 4 लाख 50 हजार कुटंबांचे सर्वेक्षण झाले आहे. मंगळवारी सर्वेक्षणाचा आकडा 7 लाख 16 हजार 500 इतका नोंदविण्यात आला आहे. बुधवारपर्यंत (दि.31) जिल्ह्यात जवळपास 80 टक्के सर्वेक्षण झाले आहे. आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिली असून, शुक्रवारपर्यंत सर्वेक्षणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 3 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्या सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी कर्मचारी देखील वाढविण्यात आले आहेत.
मनपा हद्दीत 62000
महापालिकेच्या हद्दीत खासगी शिक्षक व मनपा कर्मचारी अशा 900 कर्मचार्‍यांकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आजपर्यंत 62 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण केले आहे.
Latest Marathi News नगर जिल्ह्यात 8 लाख 80 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण Brought to You By : Bharat Live News Media.