वीजवाहिनीच्या घर्षणाने उसाच्या ट्रकला आग

आश्वी : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणार्‍या खांबे-वरवंडी शिवाच्या रस्त्याच्या वरून जाणार्‍या विद्युत वाहिनीला उसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला, तर विजेच्या धक्क्याने चालक जागीच ठार झाला. शेरी चिखलठाण येथून ट्रक (एमएच 14 बीजे 2251) ऊस भरून संगमनेर साखर कारखान्याकडे जात होता. खांबे-वरवंडी शिवेजवळील रस्ता ओलांडून गेलेल्या विद्युत वाहिनीला (तार) ट्रकचे घर्षण … The post वीजवाहिनीच्या घर्षणाने उसाच्या ट्रकला आग appeared first on पुढारी.

वीजवाहिनीच्या घर्षणाने उसाच्या ट्रकला आग

आश्वी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणार्‍या खांबे-वरवंडी शिवाच्या रस्त्याच्या वरून जाणार्‍या विद्युत वाहिनीला उसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला, तर विजेच्या धक्क्याने चालक जागीच ठार झाला. शेरी चिखलठाण येथून ट्रक (एमएच 14 बीजे 2251) ऊस भरून संगमनेर साखर कारखान्याकडे जात होता. खांबे-वरवंडी शिवेजवळील रस्ता ओलांडून गेलेल्या विद्युत वाहिनीला (तार) ट्रकचे घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यामुळे उसासह ट्रकने पेट घेतला व चालक संतोष मोटे विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडले.
ही बातमी समजल्यानंतर संगमनेर साखर कारखान्यामधून तातडीने अग्निशामक वाहन बोलावण्यात आले. त्याने आग आटोक्यात आणली.
रस्त्याच्या वरून रस्ता ओलांडून जाणार्‍या उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे मोठ्या व उंच वाहनांना मोठा धोका निर्माण होत आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाझुडपामुळे या तारा चालकांच्या लक्षात येत नसल्याचे असे अपघात होत असल्याचा दावा परिसरातील रहिवाशांनी केला आहे.
Latest Marathi News वीजवाहिनीच्या घर्षणाने उसाच्या ट्रकला आग Brought to You By : Bharat Live News Media.