Nagar : शिक्षक विरोधातील तक्रारीवरून ग्रामसभेत हाणामारी

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  गावातील व्यक्तीने गावासह केंद्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत तोडगा तर निघाला नाहीच, उलट हाणामार्‍या झाली. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बुधवारी (दि.31) हा प्रकार घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंडेगाव सह केंद्रातील … The post Nagar : शिक्षक विरोधातील तक्रारीवरून ग्रामसभेत हाणामारी appeared first on पुढारी.

Nagar : शिक्षक विरोधातील तक्रारीवरून ग्रामसभेत हाणामारी

वाळकी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  गावातील व्यक्तीने गावासह केंद्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत तोडगा तर निघाला नाहीच, उलट हाणामार्‍या झाली. नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बुधवारी (दि.31) हा प्रकार घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुंडेगाव सह केंद्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या विरोधात भाऊसाहेब शिंदे यांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी केंद्रस्तरीय बैठकीत घुसून गोंधळ घातला होता. त्यावेळी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. शिंदे हे शिक्षकांबाबत सातत्याने सोशल पोस्ट करत असल्याने गावात सतत धुसफूस चालू आहे. शिक्षकांवर कारवाईसाठी शिंदे यांनी सोमवारी (दि.29) उपोषण करताच गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकार्‍यांनी शिक्षकांची बाजू घेत गावातील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गटशिक्षणाधिकारी जाधव यांची भेट घेवून निवेदनही दिले होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेतही त्यावरून वादंग झाले. त्याचे पर्यावसन शिवीगाळ करत हाणामारीत झाले. त्यामुळे ग्रामसभा उधळली गेली. हा वाद थेट पोलिसांत गेला. भाऊसाहेब रामदास शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य संतोष संभाजी भापकर, सतिश काशिनाथ चौधरी, यश सतिश चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष संभाजी भापकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाऊसाहेब रामदास शिंदे, बायडाबाई रामदास शिंदे, निशा भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Latest Marathi News Nagar : शिक्षक विरोधातील तक्रारीवरून ग्रामसभेत हाणामारी Brought to You By : Bharat Live News Media.