कोल्हापूर: दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखे येथील तरूण जागीच ठार

किणी; पुढारी वृत्तसेवा: समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण  जागीच ठार झाला. सुनील शामराव जाधव (वय २७, रा. चांदोली वसाहत, काखे, ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. वाठार- वारणानागर रोडवर वाठार गावच्या हद्दीत आज (दि.१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, काखे … The post कोल्हापूर: दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखे येथील तरूण जागीच ठार appeared first on पुढारी.

कोल्हापूर: दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखे येथील तरूण जागीच ठार

किणी; Bharat Live News Media वृत्तसेवा: समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण  जागीच ठार झाला. सुनील शामराव जाधव (वय २७, रा. चांदोली वसाहत, काखे, ता. पन्हाळा) असे या मृत तरुणाचे नाव आहे. वाठार- वारणानागर रोडवर वाठार गावच्या हद्दीत आज (दि.१) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, काखे (ता.पन्हाळा)  येथील सुनील शामराव जाधव हा वाठार – भादोले रोडवरील एका कारखान्यात कामाला होता. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना वाठारजवळ समोरून येणारे वाहन चुकविण्याच्या प्रयत्नात त्याचा दुचाकीवरील (एमएच -०९-जीके- ०७०१) ताबा सुटला. व तो पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर (एमएच-०९- एसक्यू-४५७४) च्या  ट्रॉलीवर जाऊन आदळला. जोराच्या धडकेत त्याच्या तोंडावर व डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मोटरसायकल ट्रॉलीला अडकून तशीच उभी होती. अंगावर शहारे आणणाऱ्या या अपघातामुळे काही काळ वाठार -वारणानागर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. वडगाव पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने हलविली. पारगावच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत सुनिल हा धरणग्रस्त कुटुंबातील होता. त्याच्या मागे आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस अंमलदार रजनीकांत वाघमारे व हवालदार अनिता फारणे तपास करत आहेत.
हेही वाचा 

कोल्हापूर : लक्षतीर्थ मदरसावर कारवाईला विरोध, दिवसभर तणाव; पोलिसांचा मोठा फौजफाटा
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली
कोल्हापूर : भटक्या श्वानांना कॅनाईन डिस्टेंपरची लागण; महिन्याभरात तब्बल १३ श्वानांचा मृत्यू

Latest Marathi News कोल्हापूर: दुचाकीची ट्रॉलीला धडक; काखे येथील तरूण जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.