आरोग्य सेविकांना ‘आयुष्मान भारत’ चे कवच

पुढारी ऑनलाईन डेस्क:  आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य सेवा कवच देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केली. #Budget2024 #ViksitBharatBudget Ayushman Bharat Health care cover under Ayushman Bharat to be extended to all ASHA workers, all Anganwadi workers and helpers – Finance Minister — … The post आरोग्य सेविकांना ‘आयुष्मान भारत’ चे कवच appeared first on पुढारी.
आरोग्य सेविकांना ‘आयुष्मान भारत’ चे कवच

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क:  आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आरोग्य सेवा कवच देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केली.

#Budget2024 #ViksitBharatBudget
Ayushman Bharat
Health care cover under Ayushman Bharat to be extended to all ASHA workers, all Anganwadi workers and helpers
– Finance Minister
— PIB India (@PIB_India) February 1, 2024

मुद्रा योजनेअंतर्गत ३० कोटींचे कर्ज वाटप
उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, राहणीमान सुलभता आणि प्रतिष्ठेला गेल्या 10 वर्षांत वेग आला आहे. महिला उद्योजकांना 30 कोटी मुद्रा योजनेचे कर्ज देण्यात आले आहे.
उच्च शिक्षणातील महिलांचा टक्का वाढला
गेल्या 10 वर्षात उच्च शिक्षणातील महिलांची नोंदणी 28% वाढली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अभ्यासक्रमांमध्ये, मुली आणि महिलांची नोंदणी 43% आहे, जी जगातील सर्वाधिक आहे. या सर्व गोष्टी महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या सहभागातून दिसून येत आहे, असे देखील अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडणीवेळी स्पष्ट केले आहे.
‘या’ योजनांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान
तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवून, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश महिला आरक्षण, ग्रामीण भागात एकट्या किंवा संयुक्त मालक म्हणून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत  70% हून अधिक महिलांना घरे या माध्यमातून देशातील महिलांचा सन्मान वाढवला आहे, असे देखील अर्थमंत्री म्हणाल्या.
 
Latest Marathi News आरोग्य सेविकांना ‘आयुष्मान भारत’ चे कवच Brought to You By : Bharat Live News Media.